‘प्यार का पंचनामा 3’मध्ये हिरोंचा बदला घेताना दिसणार नुसरत भारूचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 20:59 IST2018-09-24T20:58:45+5:302018-09-24T20:59:40+5:30
‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

‘प्यार का पंचनामा 3’मध्ये हिरोंचा बदला घेताना दिसणार नुसरत भारूचा!
‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. अगदी अनपेक्षितरित्या या चित्रपटाने १०८.७१ कोटींची कमाई करत, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हा चित्रपट एक सरप्राईज हिट होता. साहजिकचं नुसरत भारूचा आणि कार्तिक आर्यन या चित्रपटातील दोन्ही लीड कलाकारांना याचा सर्वाधिक फायदा मिळाला. विशेषत: कार्तिकच्या हातात सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. नुसरतचे म्हणाल तर लवकरच ती ‘प्यार का पंचनामा 3’मध्ये दिसणार आहे. नुसरत या आपल्या आगामी चित्रपटाबद्दल कमालीची उत्सूक आहे. अलीकडे एका मुलाखतीत तिने आपली ही उत्सुकता बोलून दाखवली. ‘प्यार का पंचनामा 3’बद्दल मी प्रचंड उत्सूक आहे. कारण या फ्रेन्चाईजीच्या तिसऱ्या भागाची कथा मुलींच्या दृष्टिकोनातून लिहिली गेली आहे. अखेर मी बदला घेणार आहे. सूड उगवणार आहे,असे तिने सांगितले. एकंदर काय तर नुसरत भरूचा आपल्या या आगामी चित्रपटात मेल अॅक्टर्सवर भारी पडताना दिसणार आहे. अशात तिची उत्सुकता साहजिक आहे.
अद्याप या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेले नाही. पण लवकरच ते सुरू होईल, असे कळतेय. तूर्तास नुसरत राजकुमार रावच्या अपोझिट ‘तुर्रम खान’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. शाहिद आणि सिटी लाईट्स या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता ‘तुर्रम खान’ दिग्दर्शित करणार आहेत.