नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिकच्या प्रेमात बॉलिवूड अभिनेत्री, सर्वांसमोरच दिली कबुली, म्हणते- "मला तो आवडतो, कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:45 AM2024-08-30T10:45:37+5:302024-08-30T10:47:48+5:30

Hardik Pandya : क्रिकेटरच्या प्रेमात आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, म्हणते- "हार्दिकवर माझं प्रेम आहे"

pyar ka panchanama fame actress ishita raj said that she loves cricketer hardik pandya | नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिकच्या प्रेमात बॉलिवूड अभिनेत्री, सर्वांसमोरच दिली कबुली, म्हणते- "मला तो आवडतो, कारण..."

नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिकच्या प्रेमात बॉलिवूड अभिनेत्री, सर्वांसमोरच दिली कबुली, म्हणते- "मला तो आवडतो, कारण..."

भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविक काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेत वेगळे झाले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली होती. हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. नताशाशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकचं नाव अभिनेत्री अनन्या पांडे आणि सिंगर जास्मिन वालिया यांच्याबरोबर जोडलं गेलं होतं. आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने हार्दिक पांड्यावर प्रेम असल्याचं म्हटलं आहे. 

प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री इशिता राजने सगळ्यांसमोरच हार्दिक पांड्यावरील प्रेमाची कबुली दिली आहे. इशिताने मुलाखतीत हार्दिकबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. हार्दिक हा आवडता क्रिकेटर असण्याबरोबरच त्याच्यावर प्रेम करत असल्याचं तिने म्हटलं आहे. "हार्दिक एक ऑल राऊंडर आणि चांगला क्रिकेटर आहे. त्याची बॅटिंग बघताना मजा येते. माझं हार्दिकवर प्रेम आहे आणि मला तो आवडतो", असं इशिता फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 


कोण आहे इशिता राज? 

इशिता राज ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की स्वीटी, प्यार का पंचनामा २, यारम, जय मम्मी दी, प्रतिष्ठान अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तिचा वाइल्ड वाइल्ड पंजाब हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 

दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशाने काही वर्ष डेट केल्यानंतर लॉकडाऊनमध्ये नताशाबरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांना अगस्त्य हा मुलगा झाला. लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशा घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. आता हार्दिक सिंगर जास्मिन वालियाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 
 

Web Title: pyar ka panchanama fame actress ishita raj said that she loves cricketer hardik pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.