कंगना रणौत यांच्यासोबत हिमाचलमध्ये करतेय क्वॉलिटी टाईम एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 12:25 PM2017-07-31T12:25:08+5:302017-07-31T18:02:19+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.कॉफी विथ करनमध्ये तिने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला होता. ...
ग ल्या अनेक दिवसांपासून कंगना रणौत अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.कॉफी विथ करनमध्ये तिने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर अनेक दिवस ती न्यूज पेपरची हेडलाईन बनली होती. यानंतर नुकत्याच झालेल्या IIFA 2017 अॅवॉर्डमध्ये सैफ अली खान, वरुण धवन आणि करण जोहरकडून तिची खिल्ली उडवण्यात आली होती. कंगनाच्या आगामी चित्रपट 'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंग दरम्यान तिला दुखापत झाली होती. तलवार बाजीचा सीन्स शूट करताना तिच्या कपाळावर दुखापत झाली होती आणि तिला 15 टाक्के पडले होते. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर कंगना अचानक कुठे गायबच झाली.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कंगना सध्या आपल्या घरी आहे. हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या मंडीमध्ये सध्या आपल्या परिवारासह ती टाईम स्पेंट करते आहे. एकंदरीत कंगना सध्या कुटुबीयांसोबत क्लॉलिटी टाईम एन्जॉय करते आहे. कंगनाच्या घरी एका पूजेचे आयोजन केले आहे. जवळपास एक आठवडा कंगना मंडीमध्ये राहणार आहे. मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी'मध्ये कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारते आहे. तर या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. तसेच यात तात्या टोप्यांची भूमिका अतुल कुलकर्णी साकारणार आहे. 'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी'नंतर कंगना आगामी चित्रपट सिमरनचे शूटिंग सुरु करणार आहे.