क्वीन ऑफ फिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:15 AM2016-01-16T01:15:12+5:302016-02-06T12:13:07+5:30

अलीकडे हॉरर चित्रपट आणि बिपाशा बासू यांचे खास नाते तयार झाले आहे. रूपेरी पडद्यानंतर आता टीव्हीवरही बिप्सने आपले हे ...

Queen of Fire | क्वीन ऑफ फिअर

क्वीन ऑफ फिअर

googlenewsNext

/>अलीकडे हॉरर चित्रपट आणि बिपाशा बासू यांचे खास नाते तयार झाले आहे. रूपेरी पडद्यानंतर आता टीव्हीवरही बिप्सने आपले हे वेड जोपसले आहे.

स्मॉल स्क्रीनच्या पदार्पणासाठी तिने 'डर सबको लगता है' (डीएसएलएच) या हॉरर सीरियलची निवड केली आहे. कमजोर हृदयाच्या लोकांनी हा शो बघू नये, असा इशारा बिप्सने डीएसएलएचबद्दल बोलताना दिला.

प्रश्न - टीव्हीसाठी काम करण्याचा अनुभव कसा होता?

बिपाशा​ - मागील पाच वर्षांपासून मला यात काम करण्याच्या ऑफर होत्या. यातील बहुतेक ऑफर रियालिटी शोमधील जज आणि स्पर्धक प्रकारच्या होत्या.
मला रियालिटी शो आवडतात आणि मी ते बघतेदेखील. मात्र टीव्हीच्या क्षेत्रात पदार्पण करताना ते वेगळ्या पद्धतीने व्हावे, अशी माझी इच्छा होती. डीएसएलएचच्या निमित्ताने ती पूर्ण झाली. यासाठी मला मोबदलाही चांगला मिळाला. वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी डीएसएलएच या मालिकेचे भाग दिग्दर्शित केले आहेत. यातील कंटेंट अतिशय दर्जेदार झाले आहे. यात काम करून मी समाधानी आहे.

प्रश्न - एरवी टीव्ही एक्टर्स बॉलिवूडकडे वळतात. मात्र अलीकडे याच्या उलट घडत आहे. तुला याबद्दल काय वाटते?

बिपाशा​ - टीव्ही हे दिवसेंदिवस वेगाने विकसित होत असलेले माध्यम आहे. टीव्ही आणि सिनेमा यातील भेद आता हळूहळू कमी होतोय. काळाचा हा महिमा ओळखून सुपरस्टार्स आणि मोठमोठे एक्टर्स टीव्हीकडे वळत आहेत. यात चुकीचे काहीच नाही.

येथे एक तर पैसा व्यवस्थित मिळतो. दुसरे म्हणजे, टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपयर्ंत पोहचता.

Web Title: Queen of Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.