वाढलेल्या वजनावर रिपोर्टरने विचारला भलताच प्रश्न; विद्या बालन झाली लालबुंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 05:47 AM2017-11-15T05:47:44+5:302017-11-15T11:17:44+5:30
तूर्तास विद्या बालन ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये विद्या पोहोचली. पण या प्रमोशनल इव्हेंटमध्ये असे काही होईल, याची कल्पनाही विद्याने केली नव्हती.
त र्तास विद्या बालन ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये विद्या पोहोचली. पण या प्रमोशनल इव्हेंटमध्ये असे काही होईल, याची कल्पनाही विद्याने केली नव्हती. एका रिपोर्टरने विद्याला या इव्हेंटमध्ये असा काही प्रश्न विचारून टाकला की, विद्याचा पारा चांगलाच चढला. ‘तू केवळ महिलाप्रधान चित्रपटचं करत राहशील की, स्वत:चे वजन कमी करण्यावरही लक्ष देशील?’ असा प्रश्न एका रिपोर्टरने केला. रिपोर्टरचा हा प्रश्न ऐकून विद्या क्षणभर काय बोलावे हेच कळेना. पण दुसºयाच क्षणाला या रिपोर्टरला विद्याने चांगलेच फैलावर घेतले. ‘मी जे काही करतेय, त्यात आनंदी आहे. तू तुझा दृष्टिकोन बदलशील बरेच उपकार होतील,’असे रागात तिने सुनावले.
बॉडी शेमिंगबद्दल कुणी बोलण्याची देर की, विद्याने समोरच्याची बोलती बंद केलीच म्हणून समजा. विद्याने याहीवेळी हेच केले. अलीकडे दिलेल्या मुलाखतीत, विद्या बॉडी शेमिंगच्या मुद्यावर बोलली होती. ‘लहानपणी मी खूप जाड होते पण मी आनंदी होते. मी सुंदर आहे, असे मला वाटायचे. मी घरात धम्माल एन्जॉय करायचे. पण जेव्हाकेव्हा घरातून बाहेर पडायचे. तेव्हा लोक माझ्या वजनाबद्दलच बोलायचे. तुला तुझे वजन कमी करायला हवे, असाच सल्ला मला मिळायचा. मी मोठी झाले आणि लोकांचे अटेंशन मिळत नसल्याचे पाहून दु:खी झाले. कुठलाच मुलगा माझ्याकडे बघत नाही, याचे दु:ख मला सलायचे. मग मी वजन कमी करायचे ठरवले. मी आयुष्यात बरेच नकार पचवलेत. पुढे दीर्घकाळानंतर मला कळले की, हे सगळे कधीच संपणारे नाही. अभिनेत्री बनल्यानंतर भूमिकेनुसार, मला माझे वजन कमी करावे लागले. मी वेड्यासारखी माझ्या शरिरावर काम करायचे. पण काही वेळानंतर पुन्हा वजन वाढायचेचं. कारण माझे बॉडी स्क्रक्चरचं असे आहे. पण आता मी माझ्या शरिरासोबत आनंदी आहे. माझ्या वाढलेल्या वजनाबद्दल लोक बोलत राहतील. कारण त्यांचा दृष्टिकोन कधीच बदलणारा नाही. पण आता मला त्याची पर्वा नाही,’ असे विद्याने या मुलाखतीत सांगितले होते.
ALSO READ: विद्या बालनने मीना कुमारीचे बायोपिक का नाकारले, तुम्हाला ठाऊक आहे?