ए. आर. रहमान यांच्या वाद्यात इंटेलचे तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2016 11:15 AM2016-03-10T11:15:17+5:302016-03-10T04:15:17+5:30

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत साºया जगाला भावते. त्यांचे करोडो चाहते आहेत. रहमान हे नेहमीच आपल्या वाद्यांमध्ये ...

A. R. Intel technology in Rahman's instrument | ए. आर. रहमान यांच्या वाद्यात इंटेलचे तंत्रज्ञान

ए. आर. रहमान यांच्या वाद्यात इंटेलचे तंत्रज्ञान

googlenewsNext
रतीय संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत साºया जगाला भावते. त्यांचे करोडो चाहते आहेत. रहमान हे नेहमीच आपल्या वाद्यांमध्ये विविध तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर करतात. आता आणखी पुढे जाऊन लास वेगास येथे यावर्षी होणाºया कन्झुमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये ते इंटेलच्या की नोटचा वापर करुन खास भेट देणार आहेत. आॅस्कर विजेते रहमान सध्या इंटेल क्युरीचा वापर आपल्या वाद्यात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
इंटेल क्युरी हे सॉफ्टवेअर स्मार्टवॉच, स्मार्टफोन, स्मार्टशूज त्याशिवाय ड्रोन्स आणि इतर गोष्टींशी जोडले जाऊ शकते. 
रहमान हे इंटेल क्युरीचा वापर करुन गिटारवर आपली बोटे फिरवतील.  तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नवीन काही निर्माण करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. रहमान यांनी याचा वापर केल्यानंतर तयार होणारे संगीत हे ऐकण्यासारखे असेल.

Web Title: A. R. Intel technology in Rahman's instrument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.