आधी ‘रँचो’, आता ‘फरहान’! आमिर खान पाठोपाठ आर. माधवनलाही कोरोना व्हायरसने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:13 PM2021-03-25T15:13:47+5:302021-03-25T15:16:13+5:30

काल बुधवारी आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि आज पाठोपाठ अभिनेता आर. माधवन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली.

r madhavan announce that he has been diagnosed with covid 19 | आधी ‘रँचो’, आता ‘फरहान’! आमिर खान पाठोपाठ आर. माधवनलाही कोरोना व्हायरसने गाठले

आधी ‘रँचो’, आता ‘फरहान’! आमिर खान पाठोपाठ आर. माधवनलाही कोरोना व्हायरसने गाठले

googlenewsNext
ठळक मुद्देकाल आमिर खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्याच्या टीमने याबाबत अधिकृत माहिती दिली होती.

काल बुधवारी आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि  आज पाठोपाठ अभिनेता आर. माधवन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. माधवनने स्वत: अतिशय मजेशीर अंदाजात याची माहिती दिली.
माधवन्ने ‘3 इडियट्स’चे एक पोस्टर शेअर केले. यात तो आमिर खानसोबत दिसतोय. अखेर व्हायरसने रँचोनंतर फरहानला गाठलेच आणि ही अशी एक जागा आहे, जिथे ‘राजू’ने कधीच येऊ नये, अशी इच्छा आहे,अशी पोस्ट त्याने केली. त्याने लिहिले, ‘फरहानने रँचोला फॉलो केले आणि व्हायरस कायम आमच्या मागे होता. पण यावेळी त्याने आम्हाला गाठलेच. पण ऑल इज वेल आणि कोव्हिड लवकर बरा होईल. फक्त या ठिकाणी राजू येऊ नये, अशी इच्छा आहे. सर्वांच्या प्रेमासाठी आभार,’ असे त्याने लिहिले आहे.

तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘3 इडियट्स’ या सिनेमात आर. माधवनने फरहानची भूमिका साकारली होती आणि आमिरने रँचो साकारला होता. शर्मन जोशी राजूच्या भूमिकेत होता. 2009 साली रिलीज झालेला हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता.

काल आमिर खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्याच्या टीमने याबाबत अधिकृत माहिती दिली होती. सध्या आमिर त्याच्या घरीच क्वारंटाईन आहे.  देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बॉलिवूडमध्येही चिंतेचे वातावरण आहे. इंडस्ट्रीच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाने ग्रासले आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे.  कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, तारा सुतारिया आदींना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांच्या घरापर्यंतही कोरोना पोहोचला आहे. त्यांच्या स्टाफचे तीन कर्मचारी काल कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.

Web Title: r madhavan announce that he has been diagnosed with covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.