R Madhavan : आर. माधवनला अभिनयाऐवजी करायची होती देशसेवा, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 08:00 AM2023-06-01T08:00:00+5:302023-06-01T08:00:01+5:30

R Madhavan Birthday: हिंदी आणि साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते आर माधवनला एकेकाळी अभिनेता होण्याऐवजी सैन्यात भरती व्हायचे होते, पण...

R madhavan celebrates his 53 birthday he want to become army soldiers before actor | R Madhavan : आर. माधवनला अभिनयाऐवजी करायची होती देशसेवा, समोर आलं मोठं कारण

R Madhavan : आर. माधवनला अभिनयाऐवजी करायची होती देशसेवा, समोर आलं मोठं कारण

googlenewsNext

बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्यांपैकी एक असलेला आर माधवन 1 जून रोजी त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिंदी चित्रपटांसोबतच दक्षिण चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा आर माधवन हा अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे जो आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं सहज जिंकतो. त्याचा वाढदिवस विशेष म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एक काळ असा होता जेव्हा आर माधवनला अभिनेता नव्हे तर सैन्यात जायचे  होते.

माधवनने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमा दिले आहेत.थ्री इडियट्स, रहना है तेरे दिल मैं, रंग दे बसंती, रामजी लंदनवाले, तनु वेड्स मनु अशा अनेक सिनेमांचाच त्यात समावेश आहे. मात्र इतके सुपरहिट सिनेमा देणाऱ्या माधवनला कधीच हिरो बनायचे नव्हते. 

माधवनला सैन्य अधिकारी व्हायचे होते. त्याने नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्सची ट्रेनिंगदेखील घेतली होती. आर. माधवनचे वडील टाटा स्टील कंपनीत मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते आणि आई सरोज या बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होत्या. त्याला एक बहिण देखील आहे. तिचे नाव आहे देविका रंगनाथन. देविका युकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. माधव अभ्यासात अव्वल होता. १९८८ साली त्याला त्याच्या शाळेतून कल्चरल अॅम्बेसिडर म्हणून कॅनडामध्ये रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली होती. या व्यतिरिक्त माधवन एनसीसीचा चांगला कॅडेटदेखील होता. त्याला महाराष्ट्रातून बेस्ट कॅडेटने सन्मानित देखील केले आहे. एनसीसीसी कॅडेटच्या माध्यमातून त्याला इंग्लंडला जाण्याची देखील संधी मिळाली होती. तिथे त्याने ब्रिटीश आर्मी, रॉयल नेवी व रॉयल एअर फोर्समधून ट्रेनिंग घेतली. 
मात्र जेव्हा सैन्यात जाण्याची वेळ आली तेव्हा त्याचे वयमध्ये आले. सहा महिन्यांनी वय कमी असल्यामुळे तो सिलेक्शनमधून बाहेर झाला. 

१९९६ साली माधवनने त्याचा पोर्टफोलिओ मॉडेलिंग एजेंसीला दिला. त्याची पर्सनॅलिटी पाहून त्याला जाहिरातीची ऑफर मिळू लागल्या. १९९६ साली त्याने सँडलवूड टॉक जाहिरातीत काम केले. या जाहिरातीचे दिग्दर्शक संतोष सिवान यांनी मणिरत्नम यांना सांगितले की पुढील प्रोजेक्ट इरुवरमध्ये कास्ट केले. हा माधवनचा पहिला चित्रपट जो सुपरहिट ठरला.

त्यानंतर माधवनने चित्रपटसृष्टीत करियर करायचे ठरविले. माधवनला सिनेमा मिळवण्यासाठी जास्त धडपड करावी लागली नाही. त्यानंतर त्याचे एकानंतर एक चित्रपट हिट ठरत गेले आणि पाहता पाहता तो स्टार बनला. १९९८ साली माधवनने इंग्रजी सिनेमा इन्फर्नोमध्ये काम केले. यात त्याने भारतीय पोलिसाची भूमिका केली होती. माधवनला रहना है तेरे दिल में चित्रपटातून ओळख मिळाली.

Web Title: R madhavan celebrates his 53 birthday he want to become army soldiers before actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.