आर माधवन इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशनसाठी केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 03:39 PM2022-06-25T15:39:29+5:302022-06-25T15:59:37+5:30

R madhavan : आर माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट रिलीजसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, तो सोशल मीडियावर ट्रोल होतोय.

R madhavan claims isro used panchang for mars orbiter mission gets trolled on social media | आर माधवन इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशनसाठी केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे झाला ट्रोल

आर माधवन इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशनसाठी केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे झाला ट्रोल

googlenewsNext

आर माधवनने रॉकेट्री: द नंबी इफेक्टची घोषणा केल्यापासून, त्याचे चाहते आणि विज्ञानप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटातून आर. माधवनने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तथापि, हिंदू कॅलेंडर पंचांगने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ला अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करण्यास आणि मंगळाच्या कक्षेत पोहोचण्यास मदत केल्याचा दावा केल्यानंतर अभिनेत्याला ट्विटरवर ट्रोल करण्यात येते आहे.

आर माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट रिलीजसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, अभिनेता सिनेमाच्या प्रमोशनमध्ये  व्यस्त आहे. एका इव्हेंटदरम्यान, त्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि त्यांच्या मार्स ऑर्बिटर मिशनबद्दल सांगितले. त्यांनी दावा केला की ते पंचांग​होते, ज्याने इस्रोला अंतराळात रॉकेट सोडण्यास मदत केली. आर माधवनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अभिनेत्याला ट्रोल करण्यात येते आहे.

एका यूजरने लिहिले, विज्ञान समजणं सगळ्यांना जमत नाही, यात काही वावगे नाही, परंतु जेव्हा प्रत्यक्षात गोष्टी कशा चालतात हे माहिती नसताना त्यावर भाष्य करणं टाळवं. काही व्हॉट्सअॅप ग्रुपवरून आलेली माहिती सांगून स्वत:च हस करून घेऊ नये.#Madhavan #Rocketry #MarsMission (sic). दुसऱ्या एका युजरने लिहिले, आरमाधवनचे तोंड बंद होतेतोवर तो क्युट होता,  अनेक जणांनी वेगवेगळ्या ट्विट करत अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. 

हा चित्रपट हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे.  या चित्रपटात अभिनेता आर. माधवन नंबी यांची भूमिका साकारतो आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हिंदी, तेलुगू, मलयालम, तमिल, अंग्रेजी आणि कन्नड या भाषांमध्ये १ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: R madhavan claims isro used panchang for mars orbiter mission gets trolled on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.