R Madhavanच्या पत्नीला पाहिलंत का ?, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 03:30 PM2022-01-05T15:30:41+5:302022-01-05T15:32:36+5:30

माधवन (R Madhavan)ची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. जवळपास 8 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केले.

R madhavan gave his heart to his student sarita birji teacher student love affair | R Madhavanच्या पत्नीला पाहिलंत का ?, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

R Madhavanच्या पत्नीला पाहिलंत का ?, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

googlenewsNext

R Madhavan-Sarita Birji Love story: बॉलिवूड अभिनेता आर माधवन(R Madhvan) ला परिचयाची गरज नाही. अर्थात, त्याच्या चित्रपटांचा आकडा इतर कलाकारांच्या तुलनेत कमी असेल, पण त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांवर अशी सोडली आहे. माधवनची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

आर माधवनच्या पत्नीचे नाव सरिता बिरजी (Sarita Birji)आहे. सरिता एअर होस्टेस होती.सरती दिसायला खूपच सुंदर आहे. या दोघांच्या लग्नाला नुकतीच २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर त्यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथासारखी होती.1991मध्ये सरिता एअरहोस्टेसच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होती. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लाससाठी ती त्यावेळी महाराष्ट्रात आली होती. तिचा कोर्स संपल्यानंतर तिने माधवनचे आभार मानले आणि सोबतच त्याला डिनरसाठी आमंत्रित केले.

आपल्या पहिल्या डेटबद्दल माधवन सांगतो, 'सरिता माझी स्टुडंट होती आणि तिने मला डिनर डेटसाठी विचारलं. माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी तिला त्याचवेळी प्रपोज केले आणि नंतर तिच्याशी लग्न केले.'

आर. माधवन आणि सरिताने जवळपास 8 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न तमीळ पद्धतीने झाले. त्यांच्या मुलाचे नाव वेदांत आहे. माधवन अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत असला तरी त्याचे कधीच कोणत्या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं गेलं नाही. तो सरितावर प्रचंड प्रेम करतो. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याला तिला त्याच्यासोबत पाहायला मिळतं.

Web Title: R madhavan gave his heart to his student sarita birji teacher student love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.