बापरे! चक्क पोर्श कारमध्ये शिकतोय ड्रायव्हिंग, आर माधवनच्या लेकाचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:29 IST2023-08-01T12:28:02+5:302023-08-01T12:29:23+5:30
नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स

बापरे! चक्क पोर्श कारमध्ये शिकतोय ड्रायव्हिंग, आर माधवनच्या लेकाचा Video व्हायरल
अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत माधवन (Vedant Madhavan) स्विमिंग चॅम्पियन आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. वेदांतने मिळवलेल्या यशाचा माधवनला प्रचंड अभिमान असून त्याने तो अनेकदा सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे. वेदांतचा यशाचं कौतुक सिनेइंडस्ट्रीतीलही अनेक कलाकारांनी केलं आहे. आता वेदांतचा चक्क पोर्श चालवतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ ड्रायव्हिंग स्कुलचा असून वेदांत जगातील सर्वात महागडी कार चालवण्याची ट्रेनिंग घेताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दुबईलातला आहे. स्विमिंग चॅम्पियन वेदांत दुबईतील Galadari Motor Driving Centre मध्ये ड्रायव्हिंग शिकत असल्याचा व्हिडिओ सेंटरने शेअर केला आहे. यामध्ये तो पोर्श कारमध्ये बसलेला आहे. तर बाजूला त्याचा ट्रेनर आहे. तो व्हिडिओ सांगतो,'हाय मी वेदांत माधवन. आज मी Galadari मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आलो आहे. मी आताच थिअरी परीक्षा पास केली आहे. मी आता ड्रायव्हिंग शिकायला जात आहे. मी ही आलिशान पोर्श चालवणार आहे आणि आता लायसन्ससाठी आणखी वाट बघू शकत नाही.'
या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलंय. तर काहींनी आश्चर्यही व्यक्त केलंय. 'मी तर मारुती 800 मध्ये ड्रायव्हिंग शिकलो.' अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर दुसरा म्हणाला, 'दुबईत ही खूपच सामान्य गोष्ट आहे. जर तुमचा पगार अॅव्हरेजहून जास्त आहे तर बहुतेकांकडे प्रिमियर कारच असते.
आर माधवन च्या मुलाने स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी ५ गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्याने एप्रिलमध्ये मलेशिया इन्व्हिटेशनल एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिपमध्येही सहभाग घेतला होता.