... हे खरं असूच शकत नाही, मीराबाईचा तो फोटो पाहून आर. माधवनं असं का म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 03:16 PM2021-07-30T15:16:24+5:302021-07-30T15:17:15+5:30
मायदेशी परतल्यानंतर गावाकडे मोठ्या जंगी रॅलीत मीराबाईचं स्वागत करण्यात आलं. आपल्या लेकीचा हा सन्मान स्वागत सोहळा पाहून तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले होते.
टोक्यो ओलिंपिकच्या पहिल्याच दिवशी भारताला सिल्वर मेडल मिळवून दिल्यानंतर वेटलिफ्टर मीराबाई चानू भारतात परतली आहे. टोक्यो ओलिंपिकमध्ये मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली.जवळपास २ वर्ष कुटुंबीयांपासून दूर राहणारी मीरा सर्व नातेवाईकांना भेटली, आणि कुटुंबीयांसमवेत तिने आनंद साजरा केला. मोठ्या जल्लोषात गावक-यांनी मीराबाईचे स्वागत केले.
मायदेशी परतल्यानंतर गावाकडे मोठ्या जंगी रॅलीत मीराबाईचं स्वागत करण्यात आलं. आपल्या लेकीचा हा सन्मान स्वागत सोहळा पाहून तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले होते. मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. मीराबाई चानूच्या कामगिरीने सा-या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.आज घराघरात मीराबाई चानुच्याच नावाच्या चर्चा आहेत.
सोशल मीडियावरही मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. अशात मीराबाई चानुचा एक फोटो व्हायल झाला आहे. फोटोत मीराबाई चानु आपल्या कुटुंबासोबत खाली बसून जेवण करताना दिसत आहे. हा फोटो समोर येताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी मीराबाईचे खरे आयुष्य फोटोमुळे समोर आले. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यावर आता सेलिब्रेटीमंडळी देखील कमेंट करत व्यक्त होताना दिसत आहेत.
Hey this cannot be true. I am at a complete loss of words. https://t.co/4H7IPK95J7
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) July 29, 2021
बॉलिवूड अभिनेता आर.माधवनची नजर मीराबाईच्या या फोटोवर पडली. आर.माधवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे विचार तो सोशल मीडियाच्या माध्यामतून चाहत्यांसह शेअर करत असतो. आर. माधवनेही मीराबाईचा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्याने लिहीले आहे की, ... हे खरं असूच शकत नाही, हे सगळं पाहून आता माझ्याकडे शब्द नाहीत.” आर. माधवनच्या कमेंटवरही अनेक चाहते आपले विचार मांडताना दिसत आहे.
मुळात मीराबाईच्या ध्येयापुढे गरीबीनेही हार मानली. मोठे ध्येय डोळ्यासमोर होते म्हणून मीराबाई आज भारतीयांसाठी आभिमानास्पद बनली आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पदक जिंकल्यानंतर पहिली गोष्ट काय करणार? असा प्रश्न मीराबाईला विचारण्यात आला होता. त्यावर, मला सर्वप्रथम पिझ्झा खायचाय, असं मीराबाईने म्हटलं होतं.