नव्वदच्या दशकातील या अभिनेत्रीसोबत घडलं असं काही...ज्यामुळे देश सोडून ती विदेशात झाली स्थायिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 08:00 AM2023-07-25T08:00:00+5:302023-07-25T08:00:01+5:30
तिच्या करिअरच्या शिखरावर होती तेव्हाच तिचा अपघात झाला. रागेश्वरीच्या अख्खा आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर तिचं विश्वच बदललं.
आँखे, मुंबई से आया मेरा दोस्त, तुम जियो हजारों साल, दिल कितना नादान है, मैं खिलाडी तू अनाछी, जिद अशा अनेक चित्रपटांत मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी लुम्बा तुम्हाला आठवत असेलच. राजेश्वरी आठवण्याचे कारण म्हणजे, आज (25 जुलै) तिचा वाढदिवस.
रागेश्वरीचा पहिला सिनेमा 'ऑंखे' होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ती 'मैं खिलाड़ी तु अनाड़ी' मध्ये अक्षय कुमारची बहीण आणि सैफ अली खानची हिरोईन होती. तिचं क्यूटनेस आणि सौंदर्याची मोहिनी प्रेक्षकांवर पडली होती.
90च्या काळातील ती सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तितकीच एक उत्कृष्ट गायिकाही होती. तिचे अनेक अल्बम लोकप्रिय झाले होते. रागेश्वरी आपल्या यशाला एन्जॉय करत होती आणि आपल्या शोजसाठी देश-विदेशात प्रवास करत होती. ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती तेव्हाच तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. तिच्या चेहऱ्याला पॅरालिसीस गेला होता. त्यानंतर तिचं विश्वच बदललं.
रागेश्वरीच्या अख्खा आयुष्याला कलाटणी मिळाली. होय, सन 2000 मध्ये तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि रागेश्वरीचे अख्खे आयुष्य बदलले. शरीराचा डावा भाग पूर्णपणे लुळा पडला. तिला बोलताही येईना.तिने थेरपी आणि योगाची सुरूवात केली. उपचारानंतर ती बरी झाली. रागेश्वरी बरी झाली, पण तिचं गाणं सुटलं. अर्थात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द या जोरावर रागेश्वरी या आजारातून बरी झाली. सध्या ती लंडनमध्ये आपल्या पती व मुलीसोबत राहते.
नव्वदीच्या दशकात रागेश्वरी जोरात होती. याचदरम्यान म्हणजे 2000 साली तिने कोकाकोलासोबत संपूर्ण भारतात कॉन्सर्ट करण्याची एक डिल साईन केली होती. या डीलसोबतच रागेश्वरी व तिच्या वडिलांनी ‘Y2K’ हा म्युझिक अल्बम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. याच अल्बमधील ‘इक्की चिक्की’ या गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना रागेश्वरीला मलेरियाने गाठले.
या आजारातून रागेश्वरी लवकरच बरी होईल असे वाटत असताना काहीच दिवसांत रागेश्वरीला Bell's Palsy या आजाराचे निदान झाले आणि याच दरम्यान तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. हा अटॅक इतका मोठा होता की, रागेश्वरीच्या शरीराच्या डाव्या भागाची हालचाल मंदावली. तिला बोलताही येईना. पण जिद्दीच्या जोरावर रागेश्वरी यातून बाहेर पडली. फिजियोथेरेपीच्या मदतीने तिच्या शरीराची डावी बाजू पुन्हा कार्यरत झाली. अर्थात रागेश्वरी पुन्हा बॉलिवूडमध्ये परतू शकली नाही.
2012 मध्ये रागेश्वरी लूंबाने सुधांशु स्वरूपसोबत लग्न केलं. तिच्या आई-वडिलांनी हे लग्न जुळवलं होतं. सुधांशु व्यवसायाने एक वकिल आहे आणि लंडनमध्ये राहतो. लग्नाच्या चार वर्षानंतर ती आई झाली. ती आता संसारात आनंदी आहे. सोशल मीडियावर रागेश्वरी फॅन्ससोबत कनेक्ट असते. सोशल मीडियावर ती तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते. अजूनही ती तशीच आधीसारखी सुंदर दिसते.