Shahid Kapoor : राजकुमारच्या लेकीनं शाहिद कपूरच्या नाकात दम आणला होता..., वाचा नेमकं काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 08:00 IST2023-03-17T08:00:00+5:302023-03-17T08:00:02+5:30
Raaj Kumar's Daughter Vastavikta Pandit, Shahid Kapoor : पडद्यावर राजकुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. वास्तविकता पंडित याच राजकुमार यांची मुलगी. ही वास्तविकता शाहिदच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती...

Shahid Kapoor : राजकुमारच्या लेकीनं शाहिद कपूरच्या नाकात दम आणला होता..., वाचा नेमकं काय घडलं होतं?
बॉलिवूड स्टार्सचे क्रेझी फॅन्स आणि त्याचे अनेक क्रेझी किस्से तुम्ही वाचले असतील. शाहिद कपूरसाठी वेड्या झालेल्या एका अभिनेत्रीचा हा किस्साही असाच क्रेझी आहे. होय, या अभिनेत्रीनं शाहिद कपूरच्या नाकात दम आणला होता. ती अगदी हात धुवून शाहिदच्या मागे लागली होती. इतकी की, अखेर शाहिदला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागली होती. ही अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर तिचं नाव होत वास्तविकता पंडित. ही वास्तविकता पंडित कोण तर बॉलिवूडचे सुपरस्टार राजकुमार यांची मुलगी.
होय, पडद्यावर राजकुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. वास्तविकता पंडित याच राजकुमार यांची मुलगी. ही वास्तविकता शाहिदच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती.
वास्तविकताने १९९६ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण दशकभराच्या प्रयत्नानंतरही तिला बॉलिवूडमध्ये यश मिळालं नाही. वडील मोठे स्टार होते, पण त्यांचं स्टारडमही तिच्या कामी आलं नाही. पण शाहिद कपूर प्रकरणामुळे एकेकाळी ती प्रचंड चर्चेत आली होती.
वास्तविकता पंडित आणि शाहिद कपूर यांची पहिली भेट कोरिओग्राफर श्यामक डाबर यांच्या डान्स क्लासमध्ये झाली होती. शाहिदला पाहिलं आणि ती त्याच्यावर भाळली. इतकी की, शाहिद जिथे जाईल तिथे ती त्याचा पिच्छा करू लागली. अगदी त्याच्या घराजवळ तिने एक घरही घेतलं. शाहिद घराबाहेर पडला रे पडला की, ती आडवी यायची. मी तुझी खूप मोठी चाहती आहे, असं ती म्हणायची. पण प्रत्यक्षात प्रकरण वेगळंच होतं. वास्तविकता शाहिदवर एकतर्फी प्रेम करू लागली होती. त्याला मिळण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. शाहिद कुठेही गेला तरी ती त्याच्या मागे जायची. अनेकदा शाहिदच्या गाडीच्या बोनेटवर बसायची. रात्रंदिवस त्याच्या अपार्टमेंटजवळ भटकत राहायची.
सुरूवातीला शाहिदने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिच्यामुळे डान्स क्लासही सोडला. पण वास्तविकताच्या डोक्यातून शाहिद जाईना. मी शाहिदची पत्नी आहे, असं ती सांगत सुटली. वास्तविकताला ना कुठला मानसिक आजार होता, ना नैराश्य. त्यामुळेच तिचं हे वागणं सर्वांसाठीच धक्कादायक होतं. सुरूवातीला शाहिदने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर त्याचीही सहनशक्ती संपली. तो थेट पोलिस ठाण्यात गेला व वास्तविकताविरोधात तक्रार दाखल केली. झालं, त्या एका तक्रारीनंतर वास्तविकता नेहमीसाठी वठणीवर आली. यानंतर तिने शाहिदचा पिच्छा कायमचा सोडला. आता ती कुठे आहे, काय करतेय, याबद्दल काहीही माहिती नाही.
२००० मध्ये लॉरेन्स डिसूझाने ‘दिल भी क्या चीज है’ या चित्रपटासाठी वास्तविकताला साईन केलं होतं. तिने तिच्यासोबत काही सीन्सचं शूटींगही केलं. पण मुळातच वास्तविकतामध्ये ॲक्टिंग टॅलेंट नव्हतं. अखेर लॉरेन्सने ऐनवेळी तिची हकालपट्टी केली होती.