Video: प्रभास-पूजाचा रोमॅण्टिक अंदाज; 'आशिकी आ गई' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:19 AM2021-12-02T09:19:37+5:302021-12-02T09:21:31+5:30
Radhe shyam: 'आशिकी आ गई' हे 'राधे श्याम' चित्रपटातील पहिलं हिंदी गाणं असून नुकतंच प्रदर्शित झालेलं हे गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (pooja hegade) यांचा 'राधे श्याम' (radhe shyam) हा चित्रपट चर्चेत येत आहे. २०२२ मधील बिग बजेट चित्रपटांच्या यादीत या सिनेमाचं नाव घेतलं जात असून तो बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'आशिकी आ गई' (aashiqui aa gayi) या चित्रपटाचा एक प्रोमो रिलीज झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील हे लोकप्रिय ठरत असलेलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
'आशिकी आ गई' हे 'राधे श्याम' चित्रपटातील पहिलं हिंदी गाणं आहे. विशेष म्हणजे नुकतंच प्रदर्शित झालेलं हे गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत असून यात पूजा-प्रभासची उत्तम केमिस्ट्री दिसून येत आहे. हे गाणं प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलं आहे. या गाण्यात प्रभास- पूजाच्या केमिस्ट्री सोबतच त्यांचे आऊटफिट्सही चर्चेत येत आहेत. या दोघांनीही या गाण्यात मॅचिंग आऊटफिट्स परिधान केले आहेत. सोबतच वेगवेगळ्या लोकेशनवर या गाण्याचं चित्रीकरण झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, या गाण्याला लोकप्रिय गायक अरिजीत सिंगचा स्वरसाज लाभला आहे. तर संगीत मिथून यांनी दिलं आहे. हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शिन राधा कृष्ण कुमार यांनी केलं आहे.