Radhe Shyam: प्रभासची लोकांमध्ये दिसली जबरदस्त क्रेझ, रिलीज आधीच 'राधे श्याम'ने कमाविले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 04:29 PM2022-03-11T16:29:11+5:302022-03-11T16:29:44+5:30

साउथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे श्याम' (Radhe Shyam Movie) अखेर आज रिलीज झाला आहे.

Radhe Shyam: Prabhas has a huge craze among the people, the release of 'Radhe Shyam' has already earned so many crores | Radhe Shyam: प्रभासची लोकांमध्ये दिसली जबरदस्त क्रेझ, रिलीज आधीच 'राधे श्याम'ने कमाविले इतके कोटी

Radhe Shyam: प्रभासची लोकांमध्ये दिसली जबरदस्त क्रेझ, रिलीज आधीच 'राधे श्याम'ने कमाविले इतके कोटी

googlenewsNext

साउथचा सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे श्याम' अखेर आज रिलीज झाला आहे. बर्‍याच दिवसांपासून प्रभासचे चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते पण कोरोनामुळे अनेक वेळा त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या बाहुबलीनंतर प्रभासने 'साहो' चित्रपटात काम केले. पण या चित्रपटाच्या फ्लॉपचा प्रभाव प्रभासच्या फॅन फॉलोइंगवर झाला नाही. राधेश्यामच्या आगाऊ बुकिंगवरून याचा अंदाज येऊ शकतो. त्याचे अनेक शो हाऊसफुल्ल झाले आहेत आणि आता हा चित्रपट प्रदर्शित होताच मोठ्या पडद्यावर दाखल झाल्याचा दावा केला जात आहे.

प्रभाससाठी लोकांचे वेड पाहून हा चित्रपट उत्तर भारतात पाच ते सहा कोटींची धमाकेदार ओपनिंग करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. राधे श्यामला टक्कर देण्यासाठी मोठ्या पडद्यावर 'गंगुबाई काठियावाडी' आणि 'द बॅटमॅन' सारखे चित्रपट आधीपासूनच चांगले कलेक्शन करत आहेत. राधे श्यामसोबतच विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपटही आज प्रदर्शित झाला आहे.


राधे श्याम हा चित्रपट देशभरात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि जर आपण त्याच्या तेलुगू रिलीजबद्दल बोललो तर प्रभास हे तेलुगू चित्रपटातील खूप मोठे नाव आहे. त्याचा फायदा त्याच्या चित्रपटाला नक्कीच मिळेल. राधे श्यामने आतापर्यंत जगभरात २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. राधेश्यामने बिझनेसच्या बाबतीतही विक्रम केला आहे. असेच सुरू राहिले तर पहिल्याच आठवड्यात चित्रपटाची कमाई ३०० कोटींच्या पुढे जाऊ शकते. चित्रपटाचे थिएटर हक्क २१० कोटींना विकले गेले आहेत. हा चित्रपट राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. 'राधे श्याम'मध्ये प्रभास, पूजा हेगडे, भाग्यश्री आणि जगपती बाबू मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Radhe Shyam: Prabhas has a huge craze among the people, the release of 'Radhe Shyam' has already earned so many crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.