मुलगा की मुलगी? राधिकाच्या नव्या पोस्टवरुन चाहत्यांनी शोध लावलाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 17:44 IST2025-03-09T17:44:37+5:302025-03-09T17:44:49+5:30

राधिकाला मुलगा झाला की मुलगी याबद्दल माहिती समोर आली आहे.

Radhika Apte Shares First Pic With Husband And Baby On Women's Day Boy Or Girl Revealed | मुलगा की मुलगी? राधिकाच्या नव्या पोस्टवरुन चाहत्यांनी शोध लावलाच!

मुलगा की मुलगी? राधिकाच्या नव्या पोस्टवरुन चाहत्यांनी शोध लावलाच!

Radhika Apte: मराठमोळी राधिका आपटे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राधिका हीट चित्रपटांमध्ये जबरदस्त अशी भूमिका करते आहे. राधिकाची फॅन फाॅलोइंगही मोठी आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. लग्नाच्या १२ वर्षांनंतर अभिनेत्री राधिका आपटे आई झाली. राधिकाने गरोदर असल्याची बातमी लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सर्व चाहत्यांना आनंदाची दिली होती. त्यानंतर तिनं बाळाला जन्म दिला. तिनं सोशल मीडियावर लॅपटॉपवर काम करताना, त्याचबरोबर ब्रेस्टफीडिंगही करतानाचा फोटो पोस्ट केला होता. पण, राधिकानं तिला मुलगा झाला की मुलगी याबद्दल खुलासा केलेला नाही. पण, राधिकाच्या लेटेस्ट पोस्टवरून चाहत्यांना अंदाज लावला आहे. 

राधिकाने नुकतंच इन्स्टग्रामवर सेल्फी पोस्ट (Radhika Apte Pic With Husband And Baby On Women's Day) केला आहे. या फोटोमध्ये ती, तिचं  बाळ आणि तिचा पती दिसून येत आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "आपल्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा". राधिकाच्या या कॅप्शनवरुन तिला मुलगी झाल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.  राधिकाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 


राधिका आणि बेनेडिक्ट यांनी एक वर्ष डेटिंग केल्यानंतर २०१२ मध्ये लग्न केलं होतं. बेनेडिक्ट हा ब्रिटिश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकार आहे. अभिनेत्रीने फोबिया, हंटर, पॅड मॅन, बदलापूर, फॉरेन्सिक, बाजार, विक्रम वेधा, कबाली, अंधाधुंद, द वेडिंग गेस्ट, लस्ट स्टोरीज, मेरी ख्रिसमस, लय भारी, तुकाराम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. बाळाच्या जन्मानंतर ती पुन्हा नव्या जोमाने कामालाही लागली आहे

Web Title: Radhika Apte Shares First Pic With Husband And Baby On Women's Day Boy Or Girl Revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.