राधिका आपटेच्या घरी पहिल्या मासिक पाळीचे झाले होते जंगी सेलिब्रेशन, आईने दिले होते 'हे' खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 12:01 PM2019-09-07T12:01:24+5:302019-09-07T12:07:03+5:30

मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन या सगळ्यावर भाष्य करणारा 'पॅडमॅन' हा सिनेमा सुपरहिट ठरला.

Radhika Apte shares Story About Her Periods | राधिका आपटेच्या घरी पहिल्या मासिक पाळीचे झाले होते जंगी सेलिब्रेशन, आईने दिले होते 'हे' खास गिफ्ट

राधिका आपटेच्या घरी पहिल्या मासिक पाळीचे झाले होते जंगी सेलिब्रेशन, आईने दिले होते 'हे' खास गिफ्ट

googlenewsNext

बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. आज ती 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. राधिका ब-याच वेळा तिच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत येते. तिच्या संबंधीत आणखीन एक किस्सा तिने सांगितला होता. 
मासिक पाळीवेळचा तिचा हा किस्सा आहे.  

 

आयुष्यातील पहिल्या मासिक पाळीच्या वेळी आईने घरी खास पार्टी दिली होती आणि त्या दिवशी बरेच गिफ्टस मिळाल्याचेही राधिकाने सांगितले  होते. राधिकाचे आई वडिल डॉक्टर आहेत. त्यामुळे कधी ना कधी हे घडणार माहित होते. पहिल्या मासिक पाळीच्या पार्टीच्या वेळी आईने घड्याळ गिफ्ट दिले होते. यावेळी आपली अवस्था रडकुंडीला आल्यागत झाली होती मात्र आईच्या गिफ्टसह इतर गिफ्टसुद्धा मिळाले होते त्यामुळे मासिक पाळी आल्यामुळे नाराज झालेली राधिकाने अशा रितीने पहिल्या मासिक पाळीचे केले होते सेलिब्रेशन.

मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन या सगळ्यावर भाष्य करणारा पॅडमॅन हा सिनेमा सुपरहिट ठरला.  या सिनेमात राधिका आपटे महत्त्वापूर्ण  भूमिका साकारली होती.  पद्म पुरस्कार विजेते अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या जीवनावर 'पॅडमॅन' हा सिनेमा आधारित होता. राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. 'पॅडमॅन' हा सिनेमा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केला होता.   
 

Web Title: Radhika Apte shares Story About Her Periods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.