अंगलटपणा करणाºया साउथ स्टारची राधिका आपटेनी केली पोलखोल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 09:52 AM2018-03-14T09:52:13+5:302018-03-14T15:22:13+5:30
अभिनेत्री राधिका आपटेला आपल्या उत्कृष्ट अभिनय, लूक आणि हटके भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. राधिका आपली भूमिका पूर्ण ताकदीनिशी पार ...
अ िनेत्री राधिका आपटेला आपल्या उत्कृष्ट अभिनय, लूक आणि हटके भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. राधिका आपली भूमिका पूर्ण ताकदीनिशी पार पाडण्यासाठी कुठलीच कसर सोडत नाही. याची अनुभूती तिचा ‘पार्च्ड’ हा चित्रपट बघितल्यानंतर येतो. त्याचबरोबर राधिका आपटे पूर्णपणे प्रोफेशनल पद्धतीने स्वत:ला पडद्यावर साकारत असल्याचेही दिसून येते. कलर्सच्या ‘बीएफएफएस वीथ वोग’ या इनफिनिटी शोमध्ये जेव्हा राधिका सहभागी झाली तेव्हा तिने अभिनेत्री नेहा धूपिया हिच्यासमोर अनेक गोष्टींचे बिंधास्तपणे खुलासे केले. यावेळी तिने तामिळ चित्रपटादरम्यान झालेल्या एक जबरदस्त घटनेचाही खुलासा केला. जेव्हा राधिकाने ही घटना सांगितली तेव्हा नेहा धूपिया हिला प्रचंड धक्का बसला.
राधिकाने सांगितले की, ‘शूटवर माझा पहिलाच दिवस होता. साउथचा एक प्रसिद्ध अभिनेता सेटवर आला आणि माझ्या पायांना हाताने कुरवाळत बसला. राधिकाने सांगितले की, मी त्याला या अगोदर कधीच बघितले नव्हते. त्यामुळे त्याची ही कृती माझ्यासाठी धक्कादायक होती. त्याच्या या कृतीवर पहिली प्रतिक्रिया देताना मी त्याच्या कानशिलात लगावली. मी त्याला दाखवून दिले की, माझ्याशी पंगा घेणे किती महागात पडू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहावे. कोणीही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये हे मी त्याला दाखवून दिले.
राधिकाचा हा खुलासा खरोखरच धक्कादायक होता. नेहाला तर राधिकाने केलेल्या या खुलाशाबद्दल विश्वासच बसत नव्हता. दरम्यान, राधिका काही दिवसांपूर्वी अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राधिकाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत ‘मांझी द माउंटेन मॅन’ या बायोपिकमध्ये काम केले आहे. वास्तविक राधिकाचा स्वभाव अतिशय फटकळ आहे. याविषयी इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक व्यक्ती जाणून आहे. बºयाचदा या कारणामुळे ती ट्रोलही झाली आहे. मात्र याची पर्वा न करता तिने ट्रोलर्सला जशास तसे उत्तरही दिले आहे.