राधिका आपटेचा 'बॉम्बईरिया' चित्रपट प्रदर्शित होणार 'ह्या' दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:18 PM2018-10-24T13:18:45+5:302018-10-24T13:20:40+5:30

राधिका आपटेचा आगामी चित्रपट 'बम्बईरिया' तिच्या एका सीनमुळे चांगलाच चर्चेत आला होता. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Radhika Apte's 'Bomberiya' will be screened on 'The Day' | राधिका आपटेचा 'बॉम्बईरिया' चित्रपट प्रदर्शित होणार 'ह्या' दिवशी

राधिका आपटेचा 'बॉम्बईरिया' चित्रपट प्रदर्शित होणार 'ह्या' दिवशी

googlenewsNext
ठळक मुद्दे 'बम्बईरिया' ११ जानेवारीला होणार प्रदर्शित

राधिका आपटेचा आगामी चित्रपट 'बॉम्बईरिया' तिच्या एका सीनमुळे चांगलाच चर्चेत आला होता. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राधिका आपटेसह सिद्धांत कपूर, अक्षय ओबरॉय, शिल्पा शुक्ला आणि आदिल हुसैन या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षाच्या सुरुवातीला ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 


क्रियो फिल्मस एफएज एलएलसी आणि ब्यूटीफुल बे एंटरटेन्मेंटने  'बॉम्बईरिया' या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली. 'बम्बईरिया' चे दिग्दर्शन पिया सुकन्या यांचे असून याचे लेखन मायकल ई. वॉर्ड यांनी केले आहे. याबद्दल बोलताना वार्ड म्हणाले, ''या चित्रपटाचे वर्णन मी एक एपिक इंटीमेट कॉमेडी असे करेन. कुणाचेही मन जिंकणारा हा चित्रपट आहे. जे लोक मुंबईला पसंत करीत नाहीत ते लोक हा चित्रपट पाहून मुंबईच्या प्रेमात पडतील.''
राधिका आपटे आपल्या बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. पार्श्च्ड या चित्रपटात तिने दिलेला बोल्ड सिन चांगलाचा चर्चेत आला होता. या पाठोपाठ राधिकाचा आगामी चित्रपट 'बॉम्बईरिया' या चित्रपटातील न्यूड शॉवर सिनची चर्चा होत आहे. मात्र, या सिन देण्यापूर्वी राधिका चांगलीच घाबरली होती. 
याबाबत दिग्दर्शिका पिया सुकन्याने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले की, चित्रपटामध्ये राधिकाचा फोन एक चोर घेऊन पळून जातो. आणि राधिका त्याचा पाठलाग करते. कारण फोनमध्ये राधिकाचा आंघोळकरताना व्हिडिओ आहे. आणि यासाठीच ती घाबरते की हा व्हिडिओ इतर कुणाच्या हाती लागेल. पण वास्तव्यात हा सिन देताना राधिका चांगलीच घाबरली होती. राधिका आपटेचा 'बॉम्बईरिया' हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: Radhika Apte's 'Bomberiya' will be screened on 'The Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.