पोर्न म्हणून विकली जात राधिकाची फिल्म
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2016 02:42 PM2016-09-08T14:42:42+5:302016-09-08T20:12:42+5:30
राधिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला अद्याप प्रदर्शित न झालेला ‘पार्श’ सिनेमा कोलकात्यामध्ये पोर्न फिल्म म्हणून विक्री केला जात असल्याची ...
र धिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला अद्याप प्रदर्शित न झालेला ‘पार्श’ सिनेमा कोलकात्यामध्ये पोर्न फिल्म म्हणून विक्री केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मध्यंतरी चित्रपटातील कामुक सीन्स इंटरनेटवर लीक झाले होते. आदिल हुसैनी आणि राधिकाच्या या सेन्शुअस सीन्समुळे हा चित्रपट कोलकात्याच्या रस्त्यांवर डीव्हीडी बनवून विकला जात आहे.
निर्मात्यांनी सायबर पोलिसांना याबाबत कळवले असून अद्याप तरी कोणलाही अटक करण्यात आलेली नाही. अजय देवगण निर्मित ‘पार्श’ हा सिनेमा गुजरामधील ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळाविषयी आहे. यामध्ये चार महिलांच्या नात्याची गोष्ट गुंफण्यात आलेली आहे.
लीना यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यामध्ये राधिकासोबत सुरवीन चावला, तनिष्ठा चॅटर्जी आणि सयानी गुप्ता अशी स्टारकास्ट आहे. येत्या २३ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून आतापर्यंत जगभरातील विविध चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कार त्याने पटकावलेले आहेत.