रणबीर-आलियाच्या लेकीचा खेळकर अंदाज, पापाराझींना पाहून दिली पोज; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 12:56 PM2024-07-28T12:56:04+5:302024-07-28T12:56:45+5:30

नेहमी वैतागलेल्या मूडमध्ये दिसणारी छोटी राहा आज हसताना दिसत आहे.

Raha Kapoor in a playful mood today seen with papa Ranbir near their apartment | रणबीर-आलियाच्या लेकीचा खेळकर अंदाज, पापाराझींना पाहून दिली पोज; Video व्हायरल

रणबीर-आलियाच्या लेकीचा खेळकर अंदाज, पापाराझींना पाहून दिली पोज; Video व्हायरल

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटची (Alia Bhatt) लाडकी लेक राहा (Raha Kapoor) कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तिची एक झलक जरी दिसली तरी व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो. आतापर्यंत राहा आईवडिलांच्या कडेवर दिसली आहे. पण नुकतंच आता ती घराखाली मस्ती करताना दिसली. रणबीरसोबत ती घराखाली हसत हसत चालताना दिसली तेव्हा पापाराझींनी तिचा हा खेळकर मूड कॅमेऱ्यात कैद केला.

राहा कपूर सध्या सर्वात चर्चेतली स्टारकीड आहे. तैमुरला जी प्रसिद्धी मिळाली होती तीच आता राहालाही मिळताना दिसतीये. रणबीरचा तर लेकीवर किती जीव आहे हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. राहाच आतापर्यंत अनेकदा वैतागलेलाच चेहरा दिसला आहे. क्वचितच ती पापाराझींकडे म्हणजेच कॅमेऱ्याकडे बघून हसली आहे. पण आज राहा चक्क खेळकर मूडमध्ये दिसली. बांद्रा येथील अपार्टमेंट खाली रणबीर आणि राहा फेरफटका मारताना दिसले. यावेळी तिने क्युट व्हाईट टीशर्ट घातला होता तर खाली चॉकलेटी रंगाची शॉर्ट्स होती. रणबीर कपूर कॅज्युअल आऊटफिट आणि हॅट अशा लूकमध्ये दिसला. राहाचा हा खेळकर अंदाज पाहून नेटकरीही खूश झालेत.


हा व्हिडिओ पाहून अनेकांनी 'ऋषी कपूरसारखीच दिसत आहे' अशी कमेंट केली. तर काहींना ती आलिया सारखी वाटली. राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. सध्या ती दीड वर्षांची आहे. आतापासूनच तिला कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. राहा सध्या कपूर आणि भट कुटुंबात सर्वांचीच लाडकी आहे. 

Web Title: Raha Kapoor in a playful mood today seen with papa Ranbir near their apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.