Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:38 IST2024-11-06T13:38:02+5:302024-11-06T13:38:40+5:30
राहाचे आणखी काही गोड फोटो आजी आणि आत्याने शेअर केले आहेत.

Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
रणबीर कपूर आणि आलिया भटची लाडकी लेक राहा कपूरचा (Raha Kapoor) आज वाढदिवस. राहा दोन वर्षांची झाली आहे. गेल्या ख्रिसमसला रणबीर-आलियाने राहाला पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आणलं. तेव्हा तिच्या निळ्या डोळ्यांनी आणि क्युट लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं. यानंतर प्रत्येक वेळेस राहाची झलक सोशल मीडियावर दिसली आणि चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आता राहाचे आणखी काही गोड फोटो आजी आणि आत्याने शेअर केले आहेत.
६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाने राहाला जन्म दिला. राहाची पहिली झलक सोशल मीडियावर दिसताच सर्वांना तिच्यात ऋषी कपूरच दिसले. आज राहाच्या वाढदिवसानिमित्त आजी नीतू कपूरने एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहा आलिया आणि रणबीरच्या मध्ये आहे. रणबीर राहाच्या कपाळावर किस करताना दिसतोय तर आलिया रणबीरकडे पाहत आहे. 'out pyar's birthday. God bless' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. सोशल मीडियावर फोटो वेगाने व्हायरल होतोय.
तर दुसरीकडे रणबीरची बहीण रिद्धीमा कपूरने एक फोटो शेअर केला आहे. यात तिची लेक समारा आणि राहा आहे. समायरा राहाचे लाड करताना दिसत आहे तर राहा हसत कॅमेऱ्याकडे पाहत आहे. यासोबत रिद्धीमाने लिहिले, 'हॅपी बर्थडे क्युटी पाय, वी लव्ह यू.'
बेबी राहा कपूर आणि भट कुटुंबाची सगळ्यात लाडकी आहे. कधी आजीसोबत तर कधी चाचू अयान मुखर्जीसोबत राहाची झलक दिसते. तिच्या गोड स्माईलवर नेटकरी फिदा झाले आहेत.