राहुल भट्ट सांगतोय, मी वाईट अभिनय करत असताना प्रेक्षकांनी घेतले होते डोक्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 11:21 AM2018-04-30T11:21:31+5:302018-04-30T16:51:31+5:30
हिना या पहिल्याच मालिकेने राहुल भट्टला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत त्याने समीर ही मुख्य भूमिका साकारली होती. ...
ह ना या पहिल्याच मालिकेने राहुल भट्टला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत त्याने समीर ही मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची लोकप्रियता पाहाता त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्याने काही वर्षांसाठी अभिनयाला रामराम ठोकला. अभिनयातून ब्रेक घेण्यामागे एक खास कारण असल्याचे नुकतेच राहुलने सांगितले. राहुल सध्या दास देव या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, मी केवळ १९ वर्षांचा असताना हिना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मी मुळचा काश्मीरचा आहे. मुंबईत आल्यानंतर मला मॉडलिंगमधील काही पुरस्कार मिळाले आणि त्यामुळे हिना या मालिकेसाठी माझी निवड झाली. खरे सांगू तर मी ज्यावेळी हिना या मालिकेत काम केले, त्यावेळी अभिनयाचा काहीही गंध मला नव्हता. मी अतिशय वाईट काम करून देखील लोकांनी मला अक्षरशः डोक्यावर घेतले. माझी लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच होती. त्याचवेळी ये है मोहोब्बते या चित्रपटात काम करण्याची मला संधी मिळाली. या मालिकेतील माझा अभिनय प्रेक्षकांना तितकासा न रुचल्यामुळे माझा हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर प्रदर्शित झालेला नई पडोसन देखील तितकासा चालला नाही. हे सगळे पाहून आपण एक चांगले अभिनेते म्हणून कधीच गणले जाणार नाही याची मला कल्पना आली. त्यामुळे मी मालिका, चित्रपटात ब्रेक घेऊन सगळे लक्ष अभिनयाकडे द्यायचे ठरवले. त्याकाळात मी वर्ल्ड सिनेमा पाहिला. आपल्यात काय चुका होत आहेत हे जाणून घेतले. त्या दरम्यान मी काही मालिकांची निर्मिती केली. त्यानंतर अग्ली या चित्रपटात अनुराग कश्यपने मला खूप चांगली भूमिका साकारण्याची संधी दिली. यामुळे माझ्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. मी ब्रेक घेण्याचा जो निर्णय घेतला होता, तो नक्कीच योग्य होता असे मी सांगेन.
Also Read : ‘देवदास’ खूप बघितले; नववर्षात ‘दासदेव’ बघा!!
Also Read : ‘देवदास’ खूप बघितले; नववर्षात ‘दासदेव’ बघा!!