बॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 18:10 IST2019-09-21T18:10:00+5:302019-09-21T18:10:00+5:30
बॉलिवूडचा हा अभिनेता अवयवदानाबद्दल करणार आहे जनजागृती

बॉलिवूडचा हा अभिनेता करणार अवयव दान, वाचा सविस्तर
अभिनेता, दिग्दर्शत राहुल बोस यांंने शरीरातील प्रत्येक अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आईएएनएससोबत केलेल्या बातचीतमध्ये राहुल बोसने ही घोषणा केली आणि सांगितलं की, त्याच्या शरीरातील प्रत्येक अवयव दान करून तो खूप खूश आहे. तो त्याची हाडं, टिशूज आणि डोळ्यांच्या कॉर्निया पासून शरीरातील प्रत्येक भाग दान करणार आहे.
राहुल बोस सीआईआई इंडियन वीमेन नेटवर्क आणि यंग इंडियन्स दिल्ली चॅप्टर आयोजित एका चर्चासत्रात पॅनेललिस्ट म्हणून सहभागी होणार आहे. हे चर्चासत्र २४ सप्टेंबर रोजी दिल्लीत पार पडणार आहे. राहुल बोसच्या नुसार, तो या तारखेला तो अंगदानासाठी साईन करणार आहे. विशेष बाब म्हणजे राहुल बोस मुलांच्या शिक्षणासाठी आणि बाल लैंगिक अत्याचारावरील सामाजिक संस्थेलाही मदत करत असतो.
राहुल बोसने अवयवदानाबद्दल सांगितलं की, माझ्यासाठी हे खूप सोप्पं आहे. मला अशा गोष्टी करायला आवडतील ज्यामुळे माणसाचे जीवन आणखीन चांगले होईल. मी माझ्या जीवनातील १४ वर्षे यासारख्या अभियानात व्यतित केले आहेत. जर माझ्या अवयवाचा दान करून कोणत्या व्यक्तीला मदत करू शकेन,तर त्यात कोणतीच समस्या नाही. तुम्ही मेल्यावर तुमच्या शरीरातील अवयवांमुळे ८ ते ९ लोकांना मदत होऊ शकते. तर कोणत्याही व्यक्तीसाठी चांगले कार्य असेल.
तो पुढे म्हणाला की, अवयवदान भारतात लोकप्रिय नाही. १० लाख लोकांसाठी १ व्यक्ती अवयवदान करणारा असतो. तर स्पेनबद्दल सांगायचं तर १० लाख लोकांसाठी ४९ लोक असतात. माझ्या या प्रयत्नामुळे लोक अवयवदानाबद्दल जागरूक होतील. याबद्दल जास्त रिसर्च करतील.