'आशिकी'फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, सिनेमाचं शूटींग करताना अचानक बिघडली तब्येत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 09:25 IST2020-11-30T09:24:51+5:302020-11-30T09:25:11+5:30
पीटीआयच्या वृत्तानुसार, राहुलला दोन दिवसांआधीच ब्रेन स्ट्रोक आल्याने नानावटीमध्ये दाखल करण्यात आलंय.

'आशिकी'फेम राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका, सिनेमाचं शूटींग करताना अचानक बिघडली तब्येत!
1990 मध्ये आलेल्या सुपरहिट 'आशिकी'सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात करणारा अभिनेता राहुल रॉय ब्रेन स्ट्रोकचा शिकार झाला. राहुल कारगीलमध्ये एका सिनेमाचं शूटींग करत होता. शूटींगवेळी त्याची अचानक तब्येत बिघडी आणि त्याला लगेच मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पीटीआयच्या वृत्तानुसार, राहुलला दोन दिवसांआधीच नानावटीमध्ये दाखल करण्यात आलंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ५२ वर्षीय राहुल रॉय सध्या ICU मध्ये आहे. त्याला प्रोग्रेसिव ब्रेन स्ट्रोक आला होता. पण आता तो ठीक असून उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या सिनेमात काम करत असलेल्या राहुलला अशाप्रकारे ब्रेन स्ट्रोक आल्याने सर्वांना हैराण केलं आहे. राहुल रॉयचे अनेक फॅन्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
राहुल रॉयने १९९० मध्ये 'आशिकी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यावेळी तो लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यानंतर त्याने ४७ सिनेमे साइन केले होते. पण आशिकीनंतर त्याची जादू चालू शकली नाही आणि तो लाइमलाइटपासून दूर गेला.
त्यानंतर राहुल बिग बॉसच्या सीझन १ जिंकून चर्चेत आला होता. पण यातूनही त्याला फार यश मिळू शकलं नाही. आता इतक्या वर्षांनी तो LAC- Live the Battle मध्ये काम करणार आहे. या सिनेमाचं शूटींग तो कारगीलमध्ये करत होता. तेव्हाच त्याला ब्रेन स्ट्रोक आल्याने आता हा प्रोजेक्टही अडचणीत येतो की काय असं झालंय.