Video : नव्या गाण्यामुळे राहुल वैद्य होतोय ट्रोल; 'जिसने दारू नही पी' हे बोल ऐकून भडकले नेटकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 10:12 AM2024-08-02T10:12:45+5:302024-08-02T10:13:11+5:30

राहुल वैद्य 'जिसने दारु नही पी' गाण्यामुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले- 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'

Rahul Vaidya Trolled for his new song Jisne Daaru Nahi Pii, Woh Aadmi Hai C | Video : नव्या गाण्यामुळे राहुल वैद्य होतोय ट्रोल; 'जिसने दारू नही पी' हे बोल ऐकून भडकले नेटकरी!

Video : नव्या गाण्यामुळे राहुल वैद्य होतोय ट्रोल; 'जिसने दारू नही पी' हे बोल ऐकून भडकले नेटकरी!

'बिग बॉस १४' (Bigg Boss १४) मध्ये दिसलेला गायक राहुल वैद्यनं  (Rahul Vaidya) आपलं 'आदमी है सी' हे नवं गाणं रिलीज केलं, जे फार चर्चेत आहे.  पण याच गाण्यामुळे राहुल वैद्य अडचणीत सापडला आहे. नेटकरी त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. 'जिसने दारू नही पी' असे बोल या गाण्यात असल्याने नेटकरी त्याच्यावर भडकले आहेत. राहुल दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं असून त्यांना हे गाणं अजिबात आवडलं नाही.

राहुल वैद्यचं हे नवं गाणं ३१ जुलै रोजी 'राहुल वैद्य आरकेव्ही' या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे. हे गाणे दानिश साबरीने लिहून संगीतबद्ध केले आहे. ‘जिसने दारू नही पी वो आदमी है सी’, अशा ओळी या गाण्यामध्ये आहेत. राहुलच्या गाण्यापेक्षा त्यावर आलेल्या कमेंट चर्चेत आहेत.  'तू अप्रत्यक्षरित्या दारू पिण्यासाठीचा प्रचार करत आहेस', 'तुझ्याकडून याची अपेक्षा नव्हती', 'बकवास गाणे', 'तुझ्या करिअरची उतरती कळा सुरू झाली आहे',  अशा कमेंट युजर्संनी केल्या आहेत. या ट्रोलिंगवर अद्याप राहुलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, बारावीत शिकत असताना त्याने इंडियन आयडॉल या स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम तो फेरीत पराभूत झाला होता. त्यानंतर त्यांची लोकप्रियता खूप वाढली. २००८ मध्ये, त्याने 'जो जीता वही सुपरस्टार' हा रिअ‍ॅलिटी सिंगिंग शोचा किताब जिंकला. 'बिग बॉस १४' आणि 'खतरों के खिलाडी ११' मध्ये भाग घेतला होता.  'खतरों के खिलाडी ११' मध्ये तो फायनलिस्ट झाला होता.
 

Web Title: Rahul Vaidya Trolled for his new song Jisne Daaru Nahi Pii, Woh Aadmi Hai C

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.