कुटुंब, प्रेम, कपट आणि डार्क सीक्रेट...! पाहा, नवी वेबसीरिज ‘The Raikar Case’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 12:49 IST2020-04-05T12:47:09+5:302020-04-05T12:49:26+5:30
प्रेम, कपट आणि अनेक रहस्यांचा पर्दाफाश करणा-या या वेबसीरिजचा ट्रेलर अंगावर शहारा आणतो.

कुटुंब, प्रेम, कपट आणि डार्क सीक्रेट...! पाहा, नवी वेबसीरिज ‘The Raikar Case’चा ट्रेलर
आपल्या कुटुंबासोबत आपण सगळी सुख-दु:ख जगतो. पण कुटुंबच आपल्यातील एकाच्या जीवावर उठले तर काय होईल? याच प्रश्नाचे उत्तर देणारी The Raikar Case वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. तूर्तास या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय. प्रेम, कपट आणि अनेक रहस्यांचा पर्दाफाश करणा-या या वेबसीरिजचा ट्रेलर अंगावर शहारा आणतो.
अतुल कुलकर्णी, ललित प्रभाकर, अश्विनी भावे या दिग्गज मराठमोळ्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या वेबसीरिजमध्ये नील भूपालम, पारूल गुलाटी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
एका कुटुंबातील एक तरूण आत्महत्या करतो. पण ही आत्महत्या नसते तर हत्या असते. कुटुंबानेच ही हत्या केल्याचे या केसचा तपास करणा-या पोलिस अधिका-याला कळते. प्रकरणाचा तपास करताना या कुटुंबाची अनेक डार्क सीक्रेट समोर येतात. अर्थात ही डार्क सीक्रेट काय असतात, युवकाची हत्या का होते, या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील तर वेबसीरिज रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे.
अनेक मराठी चित्रपट बनवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे. येत्या 9 एप्रिलला Voot Select वर ही वेबसीरिज रिलीज होणार आहे.
तूर्तास तुम्ही या वेबसीरिजचा ट्रेलर पाहू शकता...