रेल्वेत अभिनेत्रीसोबत छेडछाड; मदतीसाठी आरडाओरड केली तर फक्त दोनच लोक आले धावून!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 10:27 AM2018-02-02T10:27:30+5:302018-02-02T16:00:25+5:30

मल्याळम अभिनेत्री सानुषा संतोष हिच्यासोबत छेडछाडीची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना मेंगलुरु सेंट्रल आणि थिरुवनंतपुरम यादरम्यान मावेली ...

Railweed actress; If you cried out for help, only two people came! | रेल्वेत अभिनेत्रीसोबत छेडछाड; मदतीसाठी आरडाओरड केली तर फक्त दोनच लोक आले धावून!

रेल्वेत अभिनेत्रीसोबत छेडछाड; मदतीसाठी आरडाओरड केली तर फक्त दोनच लोक आले धावून!

googlenewsNext
्याळम अभिनेत्री सानुषा संतोष हिच्यासोबत छेडछाडीची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना मेंगलुरु सेंट्रल आणि थिरुवनंतपुरम यादरम्यान मावेली एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. सानुषा थिरुवनंतपुरमला जात होती. रिपोर्ट्सनुसार, रात्री सुमारे एक वाजता जेव्हा ती अपर बर्थवर झोपली होती, तेव्हा तिला जाणवले की, तिच्या ओठांवर काहीतरी हालचाल होत आहे. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या लक्षात आले की, एक व्यक्ती तिच्या ओठांवरून हात फिरवत आहे. 

सानुषाने एका मुलाखतीत सांगितले की, ही बाब जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी लगेचच त्या व्यक्तीचा हाथ माझ्या ओठांवरून दूर केला. तसेच आरडाओरड करीत लोकांना मदतीसाठी बोलावले. मात्र कोणीही तिची मदत करण्यासाठी धावून आले नाही. विशेष म्हणजे, लोअर बर्थमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांकडूनही तिला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. जे दोन लोक तिच्या मदतीसाठी धावून आले, त्यामध्ये एक स्क्रिप्ट रायटर उन्नी, तर दुसरा एक प्रवासी ज्याचे नाव रंजित होते. 



यावेळी सानुषाने टीसीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा थिरुवनंतपुरम याठिकाणी पोहोचताच संबंधित आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर सानुषाचा प्रचंड संताप झाला. तिने मुलाखतीत म्हटले की, मला असे वाटते की लोकांना केवळ फेसबुकवरच राग व्यक्त करता येतो. कारण जेव्हा रिअल लाइफमध्ये असा काही प्रसंग घडतो तेव्हा कोणीही पुढे सरसावत नाही. जर मी फेसबुकवर या घटनेबद्दल स्टेटस पोस्ट केले तर बºयाचशा लोकांनी माझ्या सपोर्टमध्ये कॉमेण्ट लिहिल्या असत्या. शिवाय निषेधाचा डीपीही अपडेट केला असता. 

पुढे बोलताना सानुषाने सांगितले की, एक महिला होण्याच्या नात्याने माझी एकच इच्छा होती की, जेव्हा माझी छेड काढली जात होती तेव्हा लोकांनी मला सपोर्ट करायला हवा होता. सोशल मीडियावर मला सपोर्ट करून काहीही होणार नाही. हे खरोखरच दु:खदायक आहे. या घटनेनंतर माझा समाजावरील विश्वास उडाला आहे. दरम्यान, सानुषाअगोदर अमाला पॉलसह अनेक अभिनेत्रींबरोबर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. सानुषाला साउथ इंडस्ट्रीतील बेबी सानुषा या नावाने ओळखले जाते. कारण तिने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. 

Web Title: Railweed actress; If you cried out for help, only two people came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.