दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे पती आहेत गडगंज श्रीमंत; जाणून घ्या राज बब्बर यांची एकूण संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 03:09 PM2022-06-23T15:09:06+5:302022-06-23T15:10:18+5:30
Raj babbar: १९७७ मध्ये 'किस्सा कुर्सी' या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ते १९८० मध्ये 'इंसाफ का तराजू' या चित्रपटात झळकले. तेव्हापासून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली.
अभिनेता ते राजकीय व्यक्तीमत्त्व असा प्रवास करणारे दिग्गज अभिनेता म्हणजे राज बब्बर. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या राज बब्बर यांचा कलाविश्वात दबदबा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र,सोशल मीडियावर ते कायम चर्चेत असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या करिअरसह त्यांच्या वैयक्तिक जीवनाचीही चर्चा रंगली आहे. म्हणूनच, दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची म्हणजेच राज बब्बर यांची एकूण संपत्ती किती ते पाहुयात.
१९७७ मध्ये 'किस्सा कुर्सी' या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ते १९८० मध्ये 'इंसाफ का तराजू' या चित्रपटात झळकले. तेव्हापासून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
किती आहे राज बब्बर यांची संपत्ती?
२०१५ च्या निवडणुकीदरम्यान राज बब्बर यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा उल्लेख केला होता. त्यानुसार, त्यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. तसंच बँकेमध्ये ५.२२ कोटी रुपये जमा असून ५६.७३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसंच २३ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागदागिने आहेत.
राज बब्बर यांचं घर
१९८३ मध्ये राज बब्बर यांनी मुंबईतील जुहू परिसरात ऑयस्टर शेल अपार्टमेंटमध्ये एक आलिशान फ्लॅट खरेदी केला. याची किंमत २.३ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. तसंच मुंबईतील गुलमोहर रोड येथे त्यांनी ३६.५ लाखांचा एक बंगला बांधला होता. सध्या त्याची किंमत १० कोटींच्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं.
राज बब्बर यांचं कार कलेक्शन
राज ब्बर यांना गाड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्यांच्या ताफ्यात लँड क्रूझर, मर्सडीज आणि अन्य काही गा़ड्या आहेत.