​या अभिनेत्रीमुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा... राजीवने राज यांच्या अंत्यसंस्काराला देखील लावली नव्हती हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 08:38 AM2018-06-04T08:38:24+5:302018-06-04T14:08:24+5:30

राज कपूर यांनी एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक निर्माता, दिग्दर्शक म्हणून देखील आपली एक ओळख निर्माण केली होती. ...

Raj Kapoor, Raj Kapoor and Raj Kapoor were among them. Rajeev did not even celebrate the funeral of Raj. | ​या अभिनेत्रीमुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा... राजीवने राज यांच्या अंत्यसंस्काराला देखील लावली नव्हती हजेरी

​या अभिनेत्रीमुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा... राजीवने राज यांच्या अंत्यसंस्काराला देखील लावली नव्हती हजेरी

googlenewsNext
ज कपूर यांनी एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक निर्माता, दिग्दर्शक म्हणून देखील आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आवारा, जिस देस में गंगा बहती है, श्री ४२०, संगम या चित्रपटांचे प्रेक्षक आजही कौतुक करतात. राज कपूर यांना शो मॅन म्हटले जात असे. राज कपूर यांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले. त्यांच्या एका चित्रपटातील अभिनेत्रीमुळे त्यांच्यात आणि मुलगा राजीव कपूर यांच्यात दुरावा आला होता. एवढेच नव्हे तर हा दुरावा शेवटपर्यंत देखील मिटला नव्हता. कारण याच कारणामुळे राज कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी देखील राजीव आला नाही.
मधू जैन यांनी त्यांचे पुस्तक कपूरनामामध्ये राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्याविषयी लिहिले आहे. कपूर कुटुंबीयातील अनेकजणांनी बॉलिवूडवर राज्य केले आहे. पृथ्वीराज कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकून राज, शम्मी आणि शशी ही त्यांची तिन्ही मुले अभिनयक्षेत्रात आली. त्यांना या क्षेत्रात चांगले यश देखील मिळाले. त्यानंतर राज कपूर यांच्या मुलांनी देखील या क्षेत्रात आपली एक विशेष जागा निर्माण केली. रणधीर आणि ऋषी या त्यांच्या मुलांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण हे यश त्यांचा मुलगा राजीवला मिळाले नाही. एक जान है हम या चित्रपटाद्वारे राजीवने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यामुळे राम तेरी गंगा मैली या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. पण या चित्रपटात राजीवच्या अभिनयाचे कोणीच कौतुक केले नाही. या चित्रपटात संपूर्णपणे भाव मंदाकिनी खाऊन गेली. या चित्रपटाच्या यशाचा राजीवला फायदा न होता केवळ राज कपूर आणि मंदाकिनी यांना झाला. मंदाकिनी या चित्रपटामुळे स्टार झाली, पण हे यश राजीवला चाखता आले नाही. त्यामुळे याचा दोष त्याने वडिलांना दिला. राजीवने या चित्रपटानंतर कधीच राज कपूर यांच्यासोबत काम केले नाही. राजीवने त्यानंतर अनेक चित्रपटात काम केले. पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. राजीव आणि राज यांच्यात या चित्रपटामुळे इतका दुरावा निर्माण झाला होता की, राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला देखील राजीव आला नाही. 

Also Read : राज कूपर लोकांशी भांडायला निघाले म्हणून वहिदा रहमान यांनी केले असे काही.... वाचून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का

Web Title: Raj Kapoor, Raj Kapoor and Raj Kapoor were among them. Rajeev did not even celebrate the funeral of Raj.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.