विदेशात पहिल्यांदाच शूट झालेला भारतीय सिनेमा माहितीये का?, निर्मात्यांनी खर्च केला होता पाण्यासारखा पैसा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:02 PM2023-12-22T12:02:35+5:302023-12-22T12:04:36+5:30
तुम्हाला माहित आहे का की परदेशात शूट झालेला बॉलिवूडचा पहिला चित्रपट कोण होता.
बॉलिवूडचे चित्रपटांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. काळ बदलला तसे बॉलिवूडच्या चित्रपटानींही कात टाकली. पूर्वीच्या चित्रपटांचं फक्त भारतात शूटिंग व्हायचे. आज मात्र बहुतेक सिनेमांचं शूटिंग परदेशात होतं. पण तुम्हाला माहित आहे का की परदेशात शूट झालेला बॉलिवूडचा पहिला चित्रपट कोण होता. आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या बॉलिवूड चित्रपटाचे पहिल्यांदा परदेशात शूटिंग झाले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 1964 मध्ये रिलीज झालेल्या राज कपूर यांच्या 'संगम' चित्रपटाचे शूटिंग परदेशात झाले होते. परदेशात शूट झालेला हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. 'संगम' चित्रपटात राज कपूर यांच्यासोबत वैजयंती माला आणि राजेंद्र कपूरही होते. या चित्रपटात तिघांमधील प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता. 'संगम' चित्रपटातील रोमँटिक सीन्स व्हेनिस, पॅरिस आणि स्वित्झर्लंडमध्ये शूट करण्यात आले आहेत. यासोबतच राज कपूर, वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांचा 'संगम' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात दोन इंटरव्हल्स होते
राज कपूर, वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांचा 'संगम' हा राज कपूर प्रोडक्शनचा पहिला रंगीत चित्रपट होता. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी राज कपूरने परदेशात खूप पैसा खर्च केला होता. मात्र, 'संगम' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. काही मीडिया रिपोर्ट्मध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, 'अफ्रीका में हिंद' हा विदेशात शूट झालेला पहिला सिनेमा होता.