राज कपूर या चित्रपटामुळे झाले होते कर्जबाजारी, हिरॉईनचे न्यूड सीन असतानाही झाला होता सुपरफ्लॉप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 09:00 PM2019-07-14T21:00:00+5:302019-07-14T21:00:00+5:30
राज कपूर त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी कर्जबाजारी झाले होते.
१९७० साली राज कपूर यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट 'मेरा नाम जोकर' प्रदर्शित केला होता. त्यावेळी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नव्हता. राज कपूर यांचा मेरा नाम जोकर हिंदी चित्रपटांमध्ये असा पहिला चित्रपट आहे ज्यात एक नाही तर दोन इंटरव्हल होते. या चित्रपटाला ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
राज कपूर यांचा मेरा नाम जोकर हा चित्रपट ड्रीम प्रोजेक्ट जरी असला तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. वास्तविकतेत हा चित्रपट पूर्ण व्हायला जवळपास पाच ते सहा वर्षे लागले होते. या चित्रपटासाठी राज कपूर यांच्या पत्नींना त्यांचे दागिने विकावे लागले होते. कपूर कुटुंब कर्जबाजारी झाले होते. मात्र कर्जातून बाहेर पडण्यासाठी ऋषी कपूर यांना बॉबी चित्रपटातून लाँच केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत डिंपल कपाडिया होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि राज कपूर यांचे चांगले दिवस आले.
सिमी गरेवाल यांनी मेरा नाम जोकर चित्रपटात मेरीची भूमिका साकारली होती. सिमी गरेवाल या बॉलिवूडमधील पहिल्या अशा अभिनेत्री होत्या. ज्यांनी सर्वात आधी न्यूड सीन दिले होते. १९७० साली न्यूड सीन चित्रीत करणं खूप मोठी बाब होती.
मेरा नाम जोकर चित्रपटात धर्मेंद्र यांना काम मिळालं त्यामागे देखील एक स्टोरी आहे. असं सांगितलं जातं की धर्मेंद्र राज कपूर यांच्या स्टुडिओत शुटिंग करत होते. त्यावेळी अचानक त्यांची भेट राज कपूर यांच्याशी झाली. धर्मेंद्र यांनी त्यांना पाहून विचारले होते की, राज जी मला मेरा नाम जोकर चित्रपटात रोल मिळेल का ? त्यावेळी राज कपूर यांनी धर्मेंद्र यांना गळाभेट घेतली आणि अशाप्रकारे धर्मेंद्र यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
१८ डिसेंबर, १९७० साली मेरा नाम जोकर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मितीदेखी राज कपूर यांनी केली होती. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राज कपूर होते. धर्मेंद्र यांनी सर्कसमधील मालिक महेंद्र सिंगची भूमिका केली होती. या चित्रपटात मनोज कुमार, सिमी गरेवाल, ऋषी कपूर व दारा सिंग प्रमुख भूमिकेत होते.
मेरा नाम जोकर प्रदर्शित झाल्यानंतर सुपरफ्लॉप झाला होता.मात्र नंतर हा चित्रपट लोकांना खूप भावला होता. आजही हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.