Raj Kundra : सर्वोच्च न्यायालयाकडुन राज कुंद्राला दिलासा; चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 02:53 PM2022-12-13T14:53:40+5:302022-12-13T14:54:52+5:30

पोर्नोग्राफीच्या केसमध्ये राज कुंद्रा वादात अडकला होता. २ महिने त्याला जेलची हवा खावी लागली. अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली त्याची चौकशी सुरु होती. 

Raj Kundla of the Supreme Court | Raj Kundra : सर्वोच्च न्यायालयाकडुन राज कुंद्राला दिलासा; चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश

Raj Kundra : सर्वोच्च न्यायालयाकडुन राज कुंद्राला दिलासा; चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश

googlenewsNext

Raj Kundra : बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा राज कुंद्राला (Raj Kundra) दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्रा, पूनम पांडे (Poonam Pandey), शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि उमेश कामत यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. पोर्नोग्राफीच्या केसमध्ये राज कुंद्रा वादात अडकला होता. २ महिने त्याला जेलची हवा खावी लागली. अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली त्याची चौकशी सुरु होती. 

काही आठवड्यांपुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्रा च्या अटकपूर्व जामीन अर्जाची याचिका फेटाळून लावली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज कुंद्राला दिलासा मिळाला आहे. सोबतच राज कुंद्रा सोबत या प्रकरणात सहभागी असणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांना देखील दिलासा मिळाला आहे. तसेच यापुढे चौकशीत सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

काय होते प्रकरण ?

मागील वर्षी जुलै महिन्यात राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली होती. मी निर्दोष असून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा राज कुंद्राने केला होता. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या ऑफिसमध्ये पोलिसांनी छापेमारी केली होती. त्याच्या ऑफिसमधून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये ६८ पॉर्न व्हिडीओ आढळले होते.

Web Title: Raj Kundla of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.