'मी अॅप बघितलंय, फार काही नव्हतं', पोर्न फिल्म्सच्या धंद्यात अडकलेल्या राज कुंद्राच्या सपोर्टला धावला मिका सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:02 AM2021-07-21T09:02:57+5:302021-07-21T09:04:14+5:30
Raj Kundra case : मिका सिंगने मुंबईमध्ये पैपराजी सोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. राज कुंद्रा एक चांगली व्यक्ती असल्याचे मिका सिंगने म्हटले आहे. तसेच, या अॅपसंदर्भात आपल्याला अधिक माहिती नाही, पण त्याने राजच्या इतर अॅपपैकी एक अॅप पाहिले आहे.
नवी दिल्ली - बॉलीवुड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अॅपच्या माध्यमाने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर तो या प्रकरणातील प्रमुख असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. यातच आता मिका सिंग यानेही राज कुंद्रा प्रकरणावर भाष्य केले आहे. आपण राजच्या अॅपवर एक व्हिडिओ पाहिला असल्याचे त्याने म्हटले आहे. (Raj Kundra case Mika singh support raj kundra sayd he watched videos on his app)
मिका सिंगने मुंबईमध्ये पैपराजी सोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. राज कुंद्रा एक चांगली व्यक्ती असल्याचे मिका सिंगने म्हटले आहे. तसेच, या अॅपसंदर्भात आपल्याला अधिक माहिती नाही, पण त्याने राजच्या इतर अॅपपैकी एक अॅप पाहिले आहे.
राज एक चांगली व्यक्ती -
मिका सिंग म्हणाला, "मी तर काय होईल याची वाट पाहत आहे. बघूया... जे होईल चांगलेच होईल, त्यांच्या अॅपसंदर्भात मला फारसे माहीत नाही. मी एक अॅप पाहिले होते. ते सिंपल अॅप होते. त्यात फार काही नव्हते. त्यामुळे चांगलेच होईल अशी आशा करूया. मला वाटते, की राज कुंद्रा एक चांगला मुलगा आहे. आता बघू सत्य काय आणि असत्य काय, जे न्यायालयच सांगू शकते."
उद्योगात लावले 10 कोटी रुपये -
क्राइम ब्रांचनुसार, राज कुंद्राने या उद्योगात 10 कोटी रुपये लावले होते. कुंद्रा केंद्रिन कंपनीशी संबंधित असल्याचे फेब्रुवारीमध्येच स्पष्ट झाले होते. मात्र, थेट लिंक नसल्याने क्राइम ब्रांचचा तपास सुरू होता.
Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अटकेत, कुठे आहे पत्नी शिल्पा शेट्टी?
23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी -
राज कुंद्राला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अटक करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातील एका बंगल्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. तेथे अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचाच एक भाग म्हणून राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.