राज कुंद्रा प्रकरण : बॉलिवूडवर संतापले नेटकरी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय हा हॅशटॅग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:20 PM2021-07-28T16:20:43+5:302021-07-28T16:22:53+5:30
राज कुंद्राला अटक होताच सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’ म्हणत नेटक-यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता एक नवा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतोय.
पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (Raj Kundra)अटक होताच बॉलिवूडमध्ये ( Bollywood) खळबळ माजली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज कुंद्राला अटक होताच सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’ म्हणत नेटक-यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता एक नवा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतोय. होय, ओटीटी आणि सोशल मीडियावर अश्लिलता पसरवणा-या बॉलिवूडच्या कंटेंटवर थांबवा अशी मागणी करत #BollywoodStopVulgarity हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. सोबत Boycott Bollywood चा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आहे.
#BollywoodStopVulgarity
— 🇮🇳Bharti dasi JntrMntr 🔮 (@JntrmntrBharti) July 27, 2021
Sant Rampal Ji Maharaj has taken the initiative to create a healthy society, listening to his satsang, a person leads a noble life by giving up all kinds of bad deeds.
"Boycott Bollywood" pic.twitter.com/R8Y3xlGD2O
बॉलिवूड तरूणाईमध्ये अश्लिलतेचे विष पसरवत असल्याचा दावा अनेक नेटकºयांनी केला आहे. अनेकांनी बॉलिवूडमुळे भारतीय संस्कृतीला धोका निर्माण झाला असल्याचे म्हणत, हे त्वरित थांबवण्याची गरज व्यक्त केली आहे.
#GodMorningWednesday#BollywoodStopVulgaritypic.twitter.com/rNlpMl7Tzm
— Ramesh Kumar (@RameshK28235243) July 28, 2021
बॉलिवूड कायम चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचेही अनेक नेटकºयांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षात बॉलिवूड चित्रपटांत भरभरून शिव्या व बोल्ड सीन्सचा भडीमार होताना दिसतोय, ओटीटीचा कंटेंट तर कुटुंबाने एकत्र बसून पाहण्याच्या लायकीचाही नाही. याचा तरूणाईवर वाईट परिणाम असल्याचे नेटक-यांचे मत आहे. यावरचे अनेक मॅसेज, मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
#BollywoodStopVulgarity
— SAT KABIR KI DAYA (@satkabir_) July 27, 2021
Bollywood has caused more harm to the Indian society than any other thing. This need to be controlled as soon as possible. pic.twitter.com/mxA7RNpE5V
#BollywoodStopVulgarity
— Naresh Singhmar (@NareshS43783027) July 28, 2021
Boycott Bollywood forever pic.twitter.com/qmv5dnxbxq
#BollywoodStopVulgarity
— मानसिह यादव (@bQFTCyTCS1zk6df) July 28, 2021
Today Top Twitter Trending No.1️⃣#BollywoodStopVulgarity#BollywoodStopVulgaritypic.twitter.com/SK0IRAgMSe
पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने राज कुंद्राला 19जुलै रोजी अटक केली. त्यानंतर त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पॉर्न फिल्म बनवण्याच्या धंद्याचा राज कुंद्रा मास्टर माईंड असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि अन्य काही लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे.