नवऱ्याचं पॉर्नोग्राफी प्रकरण शिल्पा शेट्टीला भोवलं; लोकांनी दिला 'पॉर्न किंग'च्या पत्नीचा टॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 12:11 PM2024-02-28T12:11:40+5:302024-02-28T12:21:14+5:30

Raj Kundra: मधल्या काळात लोकांनी केलेल्या ट्रोलिंगमुळे राज कुंद्रा आणि त्याच्या कुटुंबाला कशाप्रकारे मनस्ताप सहन करावा लागला. ते कोणत्या परिस्थितीमधून गेले यावर राजने भाष्य केलं आहे.

raj-kundra-speaks-on-trolling-says-shilpa shetty-was-collateral-damage | नवऱ्याचं पॉर्नोग्राफी प्रकरण शिल्पा शेट्टीला भोवलं; लोकांनी दिला 'पॉर्न किंग'च्या पत्नीचा टॅग

नवऱ्याचं पॉर्नोग्राफी प्रकरण शिल्पा शेट्टीला भोवलं; लोकांनी दिला 'पॉर्न किंग'च्या पत्नीचा टॅग

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty)  पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला जुलै २०२१ मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. तब्बल ६३ दिवस राज कुंद्रा तुरुंगात कैद होता. या प्रकरणामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबालाही लोकांनी प्रचंड ट्रोल केलं. अलिकडेच राजने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कुटुंबाला कसा मनस्ताप झाला याविषयी भाष्य केलं आहे.

अलिकडेच राजने 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. मी एका सेलिब्रिटीसोबत लग्न केलं आहे. ते लोक मला लक्ष्य करत नाहीत. तर, ते माझ्या पत्नी आणि मुलांना ट्रोल करत आहेत. शिल्पाला या सगळ्याचा सामना करावा लागला हे चुकीचं आहे. तुम्ही मला त्यात अडकवलं ठीक आहे. पण, ती नाहक यात अडकली, असं राज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "लोकांनी केलेल्या निगेटिव्ह कमेंट मी डिलीट करतो आणि ब्लॉक करतो. मला या सगळ्या गोष्टींमुळे फारसा फरक पडत नाही. पण, माझ्या मुलांनी किंवा बायकोने अशा काही गोष्टी वाचू नयेत असं मला वाटतं. शिल्पाने व्हॅलेंटाइन डेला पोस्ट शेअर केली होती. त्याच्यावरही लोकांनी वाईट कमेंट केल्या होत्या. त्यांना अजून सत्य ठावूक नाहीये. कोर्टाच्या निर्णयाचीही ते वाट पाहात नाहीत. आणि, परस्पर त्यांनी त्यांचा निर्णय द्यायला सुरुवात केली."

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्याने अनेक खुलासे केले. तिला लोक पॉर्न किंगची पत्नी म्हणून हिनवतात त्यावेळी खूप वाईट वाटतं असं म्हणत राजने शिल्पाच्या हातून अनेक प्रोजेक्ट्सही गेल्याचं यावेळी सांगितलं.
 

Web Title: raj-kundra-speaks-on-trolling-says-shilpa shetty-was-collateral-damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.