राज कुंद्राचा नवीन अॅप सुरू करण्याचा होता विचार, शिल्पा शेट्टी नाही तर घरातील 'ही' व्यक्ती करणार होती काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:08 PM2021-07-23T13:08:47+5:302021-07-23T13:09:18+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. याच प्रकरणात जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, राज कुंद्राशिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीसोबत काम करणार होता. हा सिनेमा राज कुंद्रा एका अॅपवर रिलीज करणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन गहना करणार होती. इतकेच नाही तर गहनाने शमिता व्यतिरिक्त कंगना रणौत, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राचे देखील नाव घेतले.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गहना वशिष्ठने सांगितले की, तुरूंगात जाण्याआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी कळले की बॉलिफेम नावाचे एक नवीन अॅप लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. या अॅपवर आम्ही रिअॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि चित्रपट दाखवण्याचा विचार करत होते. या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन नव्हते. याच दरम्यान, आम्ही स्क्रिप्टवर चर्चा केली होती. त्यानंतर शमिता शेट्टी, सई ताम्हणकर एकेक स्क्रिप्टसाठी आणि आणखी दोन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार केला होता. मला अटक होण्याच्या ३ ते ४ दिवस आधी मी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगचा विचार करत होते. हे चित्रपट मी दिग्दर्शित करणार होते.
गहना शमिताला कधी भेटली नाही. तिने चित्रपटाची स्क्रिप्ट उमेश कामात यांना शमिताला द्यायला सांगितली होती. ती किती पैसे घेणार आहे आणि तिच्या काय अटी असणार आहेत याच्याशी तिला काही घेणदेण नव्हते. शमिताने उमेश कामतशी यावर चर्चा केली होती आणि यासाठी तिने होकार दिला होता, असे गहनाने सांगितले.
गहाना वशिष्ठने कंगना रनौतवरही निशाणा साधला, म्हणाली की, जर तिला बॉलिवूडमध्ये इतका त्रास होतो, तर तिने हे सोडून जायला हवे. जे लोक तिला मदत करतात त्यांनाच ती फसविते. महेश भटने कंगनाला चित्रपटात संधी दिली आणि आज ती त्यांच्या विषयी वाईटसाईट बोलते. ती बऱ्याचवेळा नेपोटिझ्मवर बोलताना दिसते आणि तिने काय केले स्वत: च्या बहिणीला मॅनेजर बनवले.