राज ठाकरेंनी आमिर खानचा लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा पाहून एका शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले-
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:30 IST2025-02-05T10:28:36+5:302025-02-05T10:30:42+5:30
जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी राज ठाकरेंनी हजेरी लावली (loveyapa, junaid khan, khushi kapoor)

राज ठाकरेंनी आमिर खानचा लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा पाहून एका शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले-
'लव्हयापा' सिनेमा दोन दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. आमिर खानचा लेक जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. मोठ्या पडद्यावर मुलाच्या पदार्पणाच्या सिनेमासाठी आमिर खान चांगलाच उत्सुक आहे. 'लव्हयापा' सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग काल ठेवण्यात आलं होतं. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, रेखा आणि अन्य सेलिब्रिटी उपस्थित होते. पापाराझींनी सिनेमा कसा वाटला असं विचारताच राज ठाकरेंनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंची 'लव्हयापा' पाहून प्रतिक्रिया
राज ठाकरे 'लव्हयापा' सिनेमा बघून बाहेर आले. समोर असलेल्या मीडियापैकी एकाने सिनेमाबद्दल राज ठाकरेंना मराठीमध्ये विचारलं की, सिनेमा कसा वाटला? तेव्हा राज ठाकरेंनी हातांनीच मस्त असं सर्वांना दाखवलं. याशिवाय superb! अशी प्रतिक्रिया दिली. एकूणच राज ठाकरेंना 'लव्हयापा' सिनेमा चांगलाच आवडलेला दिसतोय. राज ठाकरेंसोबत यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही पाहायला मिळाला. 'लव्हयापा' सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला कलाकारांची मांदियाळी दिसली
'लव्हयापा' सिनेमाविषयी
'लव्हयापा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ७ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. खुशी कपूर आणि जुनैद खान या दोघांची खास केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधतंय. रोमँटिक कॉमेडी असलेल्या या सिनेमात जुनैद-खुशीशिवाय अभिनेते आशुतोष राणाही दिसणार आहेत. आजच्या पिढीच्या प्रेमाचं चित्रण मांडणारा हा सिनेमा सर्वांमध्ये चर्चेत आहे. 'लव्हयापा' सिनेमातून खुशी-जुनैदची जोडी प्रेक्षकांना किती आवडणार, हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळेलच.