राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरेंची बॉलिवूडमध्ये एंट्री; ‘या’ चित्रपटातून पदार्पण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 05:30 PM2017-09-02T17:30:04+5:302017-09-02T23:00:04+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे हिने राजकारणात करिअर न करता बॉलिवूडची वाट धरली आहे. ...

Raj Thackeray's daughter Urvashi Thackeray enters Bollywood; 'This' film debut! | राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरेंची बॉलिवूडमध्ये एंट्री; ‘या’ चित्रपटातून पदार्पण!

राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरेंची बॉलिवूडमध्ये एंट्री; ‘या’ चित्रपटातून पदार्पण!

googlenewsNext
ाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे हिने राजकारणात करिअर न करता बॉलिवूडची वाट धरली आहे. होय, लवकरच रिलीज होणार असलेल्या ‘जुडवा-२’मध्ये उर्वशी काम करताना बघावयास मिळणार आहे. आता तुम्हाला वाटेल की, उर्वशीला मोठ्या पडद्यावर बघता येईल, परंतु उर्वशी पडद्यावर झळकणार नसून, तिने ‘जुडवा-२’चे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

चित्रपटाशी संबंधित क्रूने सांगितले की, उर्वशी जेव्हा सेटवर येत होती, तेव्हा तिच्याविषयी कोणालाच माहिती नव्हते. जेव्हा शूटिंगस्थळी यायची तेव्हा तिने कोणालाच सांगितले नव्हते की, ती कोणत्या परिवारातून आहे. वरूणचे वडील डेविड धवनने सांगिलते की, मी जेव्हा पहिल्यांदा तिला भेटलो तेव्हा मला असे वाटले की, ती शूट करू शकणार नाही. परंतु, या प्रोजेक्टसाठी तिने प्रचंड मेहनत केली आहे. वास्तविक ती खूप मेहनती असून, खूपच कमी कालावधी ती आमच्या क्रूमध्ये मिसळली होती.  

सूत्रानुसार, उर्वशीचा हा पहिला चित्रपट असतानाही तिने खूप चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी पेलली आहे. आता तर अशीही बातमी येत आहे की, उर्वशी साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार आहे. वास्तविक उर्वशीचे बॉलिवूडमध्ये करिअर करणे थोडेसे धक्कादायक आहे. कारण २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रसंगी उर्वशीने विशेष जबाबदारी बजावली होती. अशात उर्वशी राजकारणातच आपले करिअर करेल, असे बोलले जात होते. परंतु उर्वशीने चक्क बॉलिवूडमध्ये आता उडी घेतली आहे. 

असो, ‘जुडवा-२’विषयी सांगायचे झाल्यास हा चित्रपट सलमान खान याच्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा रिमेक आहे. सलमानचा हा चित्रपट १९९७ मध्ये रिलीज झाला होता. आता या चित्रपटाला २० वर्षे होत आहे. रिमेकमध्ये वरूण धवन प्रमुख भूमिकेत असून, जॅकलिन फर्नाडिस आणि तापसी पन्नू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Raj Thackeray's daughter Urvashi Thackeray enters Bollywood; 'This' film debut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.