‘राजा हिंदुस्तानी’चे अभिनेते व कथ्थक गुरु वीरु कृष्णन यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:57 PM2019-09-08T14:57:19+5:302019-09-08T15:00:01+5:30
प्रियंका चोप्रा, कतरीना कैफ, लारा दत्ता, अथिया शेट्टी अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक शिकवले.
अभिनेते व कथ्थक गुरू वीरु कृष्णन यांचे शनिवारी निधन झाले. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिने वीरू यांच्या निधनाची ट्विटरवर शेअर केली आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
वीरू हे केवळ कथ्थक गुरु नव्हते तर अभिनेतही होते. राजा हिंदुस्तानी, अकेले हम अकेले तुम, इश्क या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. प्रियंका चोप्रा, कतरीना कैफ, लारा दत्ता, अथिया शेट्टी अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक शिकवले.
omg, so sad and shocked to hear this. RIP guruji ✨🙏🏼 thank you for teaching us— hard work, discipline and to truly love the form of Kathak. https://t.co/6NvRtnb9ph
— Athiya Shetty (@theathiyashetty) September 7, 2019
अथियाने त्यांच्या निधनाचे वृत्त शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ हे भगवान, अतिशय दु:खद. परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो, गुरुजी. अपार कष्ट आणि शिस्त शिकवल्याबद्दल तुमचे आभार,’ असे अथियाने लिहिले.
You taught me to dance when I was two left feet. Your patience and passion for dance was so infectious that each one of us not only learned Kathak, but so much more from you. You will always be remembered Guruji. 🙏 #panditveerukrishnanhttps://t.co/pfQerVQgby
— PRIYANKA (@priyankachopra) September 7, 2019
प्रियंका चोप्रा हिनेही ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘ मी नीट नाचूही शकत नव्हते तेव्हापासून तुम्ही मला कथ्थक शिकवले. नृत्यावरची तुमची आस्था, तुमचा संयम आणि जिद्द पाहून आम्ही केवळ कथ्थकच शिकलो नाही तर अनेक गोष्टी शिकलो. तुमची आठवण सदैव राहील गुरूजी,’ अशा शब्दांत प्रियंकाने भावना व्यक्त केल्या.
This is very sad news indeed. Prayers and heartfelt condolences to Guruji’s family. He really was an institution & his passion for kathak and patience with his students made him an exemplary teacher. #RIP#panditveerukrishnanhttps://t.co/LDoSh3Ok6G
— Lara Dutta Bhupathi (@LaraDutta) September 7, 2019
लारा दत्ता हिनेही वीरू यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. ‘गुरूजी तुम्ही सर्वोत्तम कथ्थक गुरु होतात. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते,’ असे तिने लिहिले.