'राजा हिंदुस्तानी' सिनेमातील 'ही' अभिनेत्री आज दिसते अशी, आर्थिक तंगीमुळे सध्या करावं लागतं आहे हे काम !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 12:18 PM2019-10-04T12:18:03+5:302019-10-04T12:20:29+5:30
राजन सिप्पी आणि त्यांच्या पत्नीने दुबईमध्ये येण्यास सांगितले. तिथे त्यांनी मला कामही मिळवून दिले. त्यामुळे दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय मी घेतला.
'राजा हिंदुस्तानी' सिनेमात 'परदेसी परदेसी' गाण्यातील अभिनेत्री कल्पना अय्यर तुम्हाला आठवत असेलच. आपला अभिनय, डान्सच्या जोरावर कल्पना यांनी रसिकांवर जादू केली. मुळात कल्पना यांनी बॉलिवूडमध्ये आयटम नंबरला एक नवी ओळख मिळवून दिली. जेव्हा जेव्हा कल्पना यांचा विषय येतो तेव्हा तेव्हा त्यांच्यावर चित्रीत झालेली गाणी आपसुकच डोळ्यासमोर नाही आली तर नवलच. 'मुझे जान से भी प्यारा है', 'कोई यहां नाचे नाचे' यासारखी अनेक हिट गाणी कल्पना अय्यर यांची आठवण करून देतात. कल्पना या फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम पॉप सिंगरही आहेत. त्यांनी अनेक लाईव्ह शो केले आहेत. 'अंजाम', 'राजा हिंदुस्तानी', 'हम साथ साथ हैं' आणि 'सत्ते पे सत्ता' या सिनेमात त्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकल्या. मात्र अभिनय करता करता अचानक त्या सिनेमापासून लांब गेल्या.
त्याकाळी अमजद खान यांच्यासह त्यांचे अफेरअर असल्याच्याही तुफान चर्चा झाल्या. असे म्हटले जाते की, अमजद खान यांच्यावर त्या जीवापाड प्रेम करायच्या त्यामुळेच अमजद खानच्या निधनानंतर कल्पना यांनी कधीच लग्न केले नाही. ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब जात कल्पना अय्यर दुबईमध्ये स्थायिक झाल्या. व्यवसाय म्हणून तिथे त्यांनी रेस्टॉरेंट सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, आयुष्यात अनेक चढ उतार येतात. माझ्याही आयुष्यात आले.
काही समस्यांनाही सामोरे जावे लागले. प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली होती. त्यामुळे काम शोधण्यास सुरुवात केली. काय करावं काही सुचत नव्हतं. मात्र त्यावेळी अचानक राजन सिप्पी आणि त्यांच्या पत्नीने दुबईमध्ये येण्यास सांगितले. तिथे त्यांनी मला कामही मिळवून दिले. त्यामुळे दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय मी घेतला. आज हॉटेल व्यवसायात मी रमली आहे. त्यांमुळे चित्रपटसृष्टीपासून दुरावली असली तरी आज मला माझ्या कामातून मिळणारा आनंदामुळे मी खुश आहे.