आमिर-करिश्माच्या ‘त्या’ किसींग सीनबद्दल दिग्दर्शकाने 24 वर्षानंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 02:49 PM2020-11-15T14:49:45+5:302020-11-15T14:50:33+5:30
‘राजा हिंदुस्तानी’च्या सेटवरचा पडद्यागचा किस्सा
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान इंडस्ट्रीचे एक मोठे नाव आहे. आपल्या करिअरमध्ये आमिरने अनेक यादगार सिनेमे दिलेत. ‘राजा हिंदुस्तानी’ यापैकीच एक़ या सिनेमात आमिरसोबत करिश्मा कपूर लीड भूमिकेत दिसली होती. नुकतीच या सिनेमाला 24 वर्षे पूर्ण झालीत. या सिनेमातील किसींग सीनची त्यावेळी जबरदस्त चर्चा झाली होती. आता 24 वर्षांनंतर दिग्दर्शक धर्मेश यांनी या सीनच्या पडद्यामागची कहाणी सांगितली आहे.
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत धर्मेश यांनी एक रोचक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले, ‘राजा हिंदुस्तानी या सिनेमाील किसींग सीन तोपर्यंतचा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात लांब किसींग सीन होता. प्रत्यक्षात आम्ही तो त्यापेक्षाही मोठा शूट केला होता. कारण सेन्सॉर बोर्ड यावर कैची चालवणार,असे आम्हाला वाटत होते. मात्र बोर्डने यू सर्टिफिकेट देत सिनेमा पास केला. विशेष म्हणजे, त्यांनी हा सीनही जसा आहे तसा पास केला. हा किसींग सीन मी स्वत: एडिट करताना छोटा केला होता. कारण सिनेमा 3 तास 20 मिनिटांचा झाला होता. इतका मोठा सिनेमा त्यावेळी कोणालाच नको होता. त्यामुळे 20 मिनिटांचे सीन कापून सिनेमाची लांबी आम्ही कमी केली गेली. यात किसींग सीनही कमी केला गेला. हा सीन करिश्मा व आमिरने एका टेकमध्ये पूर्ण केला होता. पण आम्ही हा सीन शूट करताना जरा घाबरलो होतो. बरीच चर्चा आणि ब-याच रिहर्सलनंतर कुठे तो शूट झाला होता.’
अशी झाली होती करिश्माची अवस्था
अलीकडे एका मुलाखतीत करिश्मा कपूर या सीनबद्दल बोलली होती. तिने सांगितले, ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाबद्दलच्या अनेक आठवणीत आहे. पण हा चित्रपट रिलीज झाल्यावर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती यातील किसींग सीनची. पण हा सीन शूट करायला आम्हाला तीन दिवस लागले होते, हे कदाचित लोकांना माहित नाही. फेब्रुवारी महिन्यात उटीत कडाक्याची थंडी होती आणि या कडाक्याच्या थंडीत संध्याकाळी 6 वाजता हा सीन शूट केला गेला होता. मी थंडीने अक्षरश: कुडकुडत होते आणि तशास्थितीत मी हा सीन दिला होता. कधी एकदा हा सीन संपतो, असे मला झाले होते.
‘राजा हिंदुस्तानी’ हा 90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा होता. सध्याच्या चित्रपटात किसींग ही बाब कॉमन आहे. मात्र त्याकाळात अशा सीन्सची प्रचंड चर्चा व्हायची. आमिरने राजा हिंदुस्तानी, दिल, इश्क, मन, रंग दे बसंती, थ्री इडियट या चित्रपटांमध्ये लिप लॉक सीन्स दिले आहेत.