​राजमौली यांनी उघड केले, प्रभासचे ‘टॉप सीक्रेट’ !!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 04:49 AM2017-06-07T04:49:02+5:302017-06-07T10:26:59+5:30

‘बाहुबली2’ रिलीज होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला, पण ना या चित्रपटाची कमाई थांबली, ना या चित्रपटाबद्दलचे लोकांचे क्रेज. होय, ...

Rajamouli disclosed, 'Top Secret' of Prabhas! | ​राजमौली यांनी उघड केले, प्रभासचे ‘टॉप सीक्रेट’ !!

​राजमौली यांनी उघड केले, प्रभासचे ‘टॉप सीक्रेट’ !!

googlenewsNext
ाहुबली2’ रिलीज होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला, पण ना या चित्रपटाची कमाई थांबली, ना या चित्रपटाबद्दलचे लोकांचे क्रेज. होय, आत्तापर्यंत या चित्रपटात १७०० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. अद्यापही अनेक देशांत हा चित्रपट रिलीज होणे बाकी आहे. अलीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली एका ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. विशेष म्हणजे, ‘बाहुबली’ प्रभासबद्दलचे एक रहस्यही त्यांनी उघड केले. ते म्हणजे प्रभास बिर्याणीचा प्रचंड शौकीन आहे.

‘बाहुबली2’च्या चित्रीकरणादरम्यान प्रभास कडक डाएटवर होता, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. यादरम्यान महिन्यातून एकदा त्याला आवडेल ते खाण्याचे स्वातंत्र्य असायचे. म्हणजेच महिन्यात एकदा तो Cheat diet वर जायचा. या एका दिवसांत प्रभास कमीत कमी १५ प्रकारच्या बिर्याणी खायचा. यापैकी अनेक प्रकारच्या बिर्याणीचे नाव सेटवरच्या लोकांना ठाऊकही नसायचे.  Cheat diet प्रभास वेगळ्याच उत्साहात एन्जॉय करायचा. एकेदिवशी प्रभासचे जीजाई त्याच्यासाठी घरी बनलेली बिर्याणी सेटवर घेऊन आलेत. पण त्यासोबत चटणी नव्हती. प्रभास चटणी नाही म्हटल्यावर इतका दु:खी झाला की, त्याच्या जीजाजीला रात्री २ वाजता घरी जावून चटणी आणावी लागली. तेवढ्या रात्री बहिणीने चटणी बनवली. जीजाजी ती घेऊन आलेत, तेव्हा कुठे प्रभास जेवला.



ALSO READ : MUST READ : ​अमेरिकेतील महिनाभराच्या सुट्टीत प्रभासने काय काय केले?

प्रभास खाण्यासोबतच बॉस्केटबॉल आणि फुटबॉलचाही शौकीन आहे. आपल्या हैदराबाद येथील घरी त्याने खेळासाठी खास कोर्ट बनवून घेतले आहे. नुकताच प्रभास अमेरिकेवरून सुट्टी एन्जॉय करून परतला. येत्या दिवसांत तो त्याचा आगामी सिनेमा ‘साहो’चे शूटींग सुरु करणार आहे.

 

Web Title: Rajamouli disclosed, 'Top Secret' of Prabhas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.