मेव्हण्यासोबतच पदार्पण, तो बनला 'परफेक्शनिस्ट' पण मी... राजेंद्रनाथ जुत्शींच्या इंटरेस्टिंग गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:54 PM2024-03-07T14:54:16+5:302024-03-07T14:55:40+5:30
राजेंद्रनाथ जुत्शी हे आमिर खानचे मेव्हणे आणि इमरान खानचे सावत्र वडील आहेत.
अनेक हिंदी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारलेले अभिनेते राजेंद्रनाथ जुत्शी यांचा आज 61 वा वाढदिवस. नुकत्याच रिलीज झालेल्या आदित्य धर दिग्दर्शित 'आर्टिकल 370' सिनेमात त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. राजेंद्रनाथ जुत्शी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहेत.खूप कमी जणांना माहित असेल की ते 'जाने तू या जाने ना' फेम इमरान खानचे सावत्र वडील आणि आमिर खानचे मेव्हणे आहेत. होय राजेंद्रनाथ जुत्शी (Rajendranath Zutshi) यांचं हे कनेक्शन कोणालाच फारसं माहित नाहीए.
राजेंद्रनाथ जुत्शी यांचा जन्म काश्मिरी हिंदू कुटुंबात श्रीनगर येथे झाला. त्यांचे आजोबा दीनानाथ जुत्शी हे सुद्धा अभिनेते होते. तर आमिर खानची चुलत बहीण नुजहत जहा यांचे ते दुसरे पती आहेत. या नात्याने ते इमरान खानचे सावत्र वडील आहेत. मात्र २००७ मध्ये राज जुत्शी आणि आमिरच्या बहिणीचा घटस्फोट झाला. लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नुजहत आण राज यांना मूल झालं नाही. मात्र राज यांचं सावत्र मुलगा इमरानच्या खूप जवळ होते. जेव्हा इमरानने मामा आमिर खानच्या प्रोडक्शन अंतर्गत 'जाने तू या जाने ना' मधून करिअरला सुरुवात केली तेव्हा ते खूप खूश झाले होते.
चाळीस वर्षांपूर्वी आमिर खानने 'कयामत से कयामत तक' सिनेमातून पदार्पण केले होते. या सिनेमात राजेंद्रनाथ जुत्शी यांचीही भूमिका होती. एकदा एका मुलाखतीत त्यांना सिनेमातील अपयशाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले, "जर माझ्या मनात अपयशाबद्दल कडवटपणा राहिला असता तर माझं आयुष्य नरक झालं असतं. आमिर आणि मी कयामत से कयामत तक मधून सोबतच सुरुवात केली. पण अभिनेता म्हणून आम्ही दोघंही खूप वेगळे पुढे गेलो. लोक मला अनेकदा म्हणतात की आमिर कुठे पोहोचला बघा पण तसं नाहीए. मला याचं दु:ख होत नाही. अभिनेता म्हणून आमच्या वाटा वेगळ्या होत्या."