Birth Anniversary: ‘काकां’च्या प्रेमात वेडी झाली होती ही अभिनेत्री, एकाच टुथब्रशने करायचे ब्रश!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 12:29 PM2019-12-29T12:29:40+5:302019-12-29T12:30:56+5:30
29 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. यातील काही अभिनेत्रींसोबत राजेश खन्ना यांचे नाव जोडले गेले.
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे चित्रपट, त्यांच्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत असतील. 1969 ते 1971 या काळात राजेश खन्ना यांनी 15 सोलो हिट सिनेमे दिलेत. यानंतर त्यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे, आज राजेश खन्ना यांचा वाढदिवस. 29 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या राजेश खन्ना यांनी त्याकाळातल्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. यातील काही अभिनेत्रींसोबत राजेश खन्ना यांचे नाव जोडले गेले. यात अभिनेत्री टीना मुनिमचेही नाव होते.
राजेश खन्ना आणि टीना मुनिम या जोडीने एकाहून एक सरस चित्रपट दिलेत. ‘सौतन’च्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढु लागली. दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. दोघेही एकाच टुथब्रशचा वापर करण्यापर्यंत हे नाते पुढे गेले होते. टीनाला राजेश खन्ना यांच्याशी लग्न करायचे होते. राजेश खन्ना खरे तर विवाहित होते. पण याऊपरही त्यांनी टीनाला लग्न करण्याचे वचन दिले होते. पण प्रत्यक्षात पत्नी डिंपलला घटस्फोट देण्यास राजेश खन्नाचे मन कधीही धजावले नाही. अखेर टीना वाट पाहून थकली. राजेश खन्ना यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून तिने राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. 1987 मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले.
डिंपल कपाडियासोबत लग्न करण्यापूर्वी राजेश खन्ना सात वर्षे अभिनेत्री अंजू महेन्द्रूसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अंजू आणि राजेश खन्ना यांचे अफेअर हे ते दोघे इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनचे होते. ते दोघे शाळेपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. राजेश खन्ना त्या काळचे सुपरस्टार असल्याने या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघे लिव्हइनध्येसुद्धा राहत होते. पण ‘आराधना’ या चित्रपटानंतर तर राजेश खन्ना यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. हे स्टारडम राजेश खन्ना यांच्यावर हावी झाले. त्यांचे पाय जमिनीवर राहिले नव्हते. यशाचा गर्व करू नये, असे अंजू यांचे मत होते. पण राजेश खन्ना काहीही समजण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावरून वाद झालेत आणि अखेर राजेश खन्ना यांनी अंजूसोबत नाते तोडण्याचे ठरवले. एवढचे नव्हे तर अंजू यांचे करियर संपुष्टात यावे यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले होते.
एका मुलाखती दरम्यान अंजू यांनी सांगितले होते की, त्या खूप मोकळ्या विचारायच्या होत्या मात्र विनोद खन्ना ट्रेडिशनल विचाराचे होते. दोघांमध्ये नेहमीच मतभेद व्हायचे. इतकेच नाही तर त्यांच्या स्कर्ट पासून ते साडी परिधान करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींवर ते आक्षेप घ्यायचे.