​राजेश खन्ना नव्हे तर हा अभिनेता होता आनंद या चित्रपटासाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 06:21 AM2017-11-08T06:21:27+5:302017-11-08T11:51:27+5:30

आनंद या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची ...

Rajesh Khanna, the first choice for Hrishikesh Mukherjee for the film Anand | ​राजेश खन्ना नव्हे तर हा अभिनेता होता आनंद या चित्रपटासाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली चॉईस

​राजेश खन्ना नव्हे तर हा अभिनेता होता आनंद या चित्रपटासाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली चॉईस

googlenewsNext
ंद या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील राजेश खन्ना यांचे काम तर प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. राजेश खन्ना यांची बाबूमोशाय बोलण्याची स्टाईल तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. राजेश खन्ना यांच्या करियरमधील सगळ्यात चांगल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी राजेश खन्ना हा हृषिकेश मुखर्जी यांची पहिली चॉईस कधीच नव्हता.

Raj Kapoor 

राजेश खन्ना यांच्या आधी हा चित्रपट शोमॅन राज कपूर यांना ऑफर करण्यात आला होता. हृषिकेश मुखर्जी आणि राजेश खन्ना यांची मैत्री अतिशय घट्ट होती. राज प्रेमाने हृषिकेश यांना बाबू मोशाय अशी हाक मारत असत. हीच गोष्ट हृषिकेश यांनी चित्रपटात वापरली होती. आनंद हा चित्रपट खरे तर पन्नाशीच्या दशकात बनवण्याचे ठरवण्यात आले होते. पण त्याचवेळी जिस देस में गंगा रहता है या चित्रपटात राज कपूर व्यग्र असल्याने हा चित्रपट ते करू शकले नाही. जिस देस में गंगा रहता है या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी संगम या चित्रपटावर काम सुरू केले. त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा चित्रपट करण्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे या चित्रपटाचे काम त्यावेळी देखील सुरू झाले नाही. सत्तरीच्या दशकात मेरा नाम जोकर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यावर राज यांच्याकडे कोणताच चित्रपट नव्हता. त्यावेळी हृषिकेश यांनी पुन्हा एकदा आनंद या चित्रपटासाठी त्यांना विचारले होते. पण राज कपूर यांना बॉबी हा चित्रपट बनवायचा होता. त्यामुळेच त्यांनी त्यावेळी देखील नकार दिला. त्यामुळे हृषिकेश यांनी या चित्रपटासाठी शशी कपूर यांना विचारले. पण शशी देखील त्यांच्या चित्रपटाच व्यग्र असल्याने त्यांना आनंद चित्रपटाचा भाग होता आले नाही. 
राजेश खन्ना सत्तरीच्या दशकात हृषिकेश मुखर्जी यांच्या बावर्ची या चित्रपटात काम करत होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरण्याच्या दरम्यान हृषिकेश यांनी राजेशला आनंद या चित्रपटाची पटकथा ऐकवली आणि क्षणातच राजेश खन्ना यांनी या चित्रपटासाठी होकार दिला. 

Also Read : ​इंदिरा गांधी यांच्यासोबत चित्रपटसृष्टीतील दिग्गज एका फोटो फ्रेममध्ये, दुर्मिळ फोटोतील कलाकार ओळखा पाहू ?

Web Title: Rajesh Khanna, the first choice for Hrishikesh Mukherjee for the film Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.