‘2.0’ चित्रपटाच्या सेटवर रजनीकांतला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 10:14 AM2016-12-04T10:14:50+5:302016-12-04T10:17:27+5:30

सुपरस्टार रजनीकांत ‘२.०’ चित्रपटाच्या सेटवर खाली पडून जखमी झाला आहे. शनिवारी चेन्नईमध्ये शूटींग करत असताना खाली कोसळल्यामुळे त्याच्या गुडघ्याला ...

Rajinikanth hurt on set of '2.0' | ‘2.0’ चित्रपटाच्या सेटवर रजनीकांतला दुखापत

‘2.0’ चित्रपटाच्या सेटवर रजनीकांतला दुखापत

googlenewsNext
परस्टार रजनीकांत ‘२.०’ चित्रपटाच्या सेटवर खाली पडून जखमी झाला आहे. शनिवारी चेन्नईमध्ये शूटींग करत असताना खाली कोसळल्यामुळे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे रजनीकांत सुखरूप असून दवाखान्यात उपचार घेऊन त्याच दिवशी रात्री त्याने शुटींग पूर्ववत सुरू केली.

चेन्नईतील केलम्बाक्कम भागात तो ‘रोबोट’चा सिक्वेल ‘२.०’ सिनेमाचे चित्रिकरण करत आहे. एका सीनदरम्यान तो अचानक खाली पडल्यामुळे त्याच्या उजव्या गुडघ्याला मार लागला. या अपघातामुळे सर्वच जण काळजीत पडले. ‘थलैवा’ पडले म्हणून एकच गोंधळ उडाला.

जवळच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी दुखापत गंभीर नसल्याचे सांगितल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. रजनीकांत जखमी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्याच्यास काळजीपोटी लोक विचारणा सुरू झाली.

                                             
                                             रोबोट २ : अक्षय कुमार 

रजनीकांतचा मॅनेजर रिआझ अहमदने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून तो सुखरुप असल्याची माहिती दिली. यामध्ये तो कॅराव्हॅनमधून निघून कारमध्ये जाताना दिसतो. तसेच चाहत्यांना अभिवादनही करताना दिसतो.

शंकर दिग्दर्शित ‘२.०’मध्ये रजनीकांतसोबत अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन हेसुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षय यामध्ये खलनयक असून पुढील वर्षी दिवाळीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुंबईत झालेल्या एका भव्य कार्यक्रमात चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. ‘रोबोट’प्रमाणे या चित्रपटाचे संगीतसुद्धा ए. आर, रहमान देणार असून यामध्ये केवळ एकच गाणे आहे. 

Web Title: Rajinikanth hurt on set of '2.0'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.