रजनीकांत यांचा ‘दरबार’ ठरला ‘घाट्याचा सौदा’, वितरक बसणार उपोषणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 11:11 AM2020-02-07T11:11:03+5:302020-02-07T11:11:29+5:30
रजनीकांत यांच्या स्टारडमला उतरती कळा?
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे, जगभरातील चाहत्यांसाठी उत्सव असतो. त्यांच्या प्रत्येक सिनेमावर चाहत्यांच्या उड्या पडतात. साहजिकच रजनीकांत यांचा सिनेमा म्हणजे, निर्मात्या आणि वितरकांसाठीही फायद्याचा सौदा असतो. पण रजनीकांत यांच्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘दरबार’ हा सिनेमा मात्र निर्माता व वितरकांसाठी ‘घाट्याचा सौदा’ ठरला आहे. इतका की, आता वितरकांनी आपल्या नुकसानभरपाईसाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
खरे तर व्यापार तज्ज्ञांच्या मते, रजनीकांतच्या ‘दरबार’ ने जगभरात 250 कोटींची कमाई केली आहे. मात्र याऊपरही या चित्रपटाला 70 कोटींचे नुकसान झाले आहे. या चित्रपटाचा एकूण बजेट 200 कोटी इतका होता. विशेष म्हणजे, त्यापैकी निम्मी रक्कम रजनीकांत यांची फी होती. प्रचंड तोटा सहन करावा लागल्याने आता वितरकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे आणि यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
रजनीकांत यांच्या घरी घेतली धाव
काही दिवसांपूर्वी वितरकांनी आपल्या नुकसानभरपाईसाठी रजनीकांत यांच्या चेन्नईस्थित घरी धाव घेतली. मात्र सुरक्षारक्षकांनी वितरकांना हाकलून लावले होते. यावरही वितरकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रजनीकांत यांना या मुद्यावर आम्हाला भेटण्याचीही गरज वाटली नाही. हे दुर्दैवी आहे. पण आम्हीही हार मानणार नाही. यामुळेच आता आम्ही उपोषणावर बसण्याचा निर्धार केला आहे, असे एका वितरकाने सांगितले.
दिग्दर्शकाला धमक्या, सुरक्षेची मागणी
Film director A.R. Murugadoss approaches Madras High Court seeking police protection from film distributors, who claim to have incurred losses due to Rajinikanth starrer film 'Darbar'. pic.twitter.com/3qUQ3DuhkQ
— ANI (@ANI) February 6, 2020
वितरकांच्या एका गटाने नुकसानभरपाईसाठी आग्रह धरला असतानाच चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादास यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करत, संरक्षणाची मागणी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.
‘दरबार’चे लेखन व दिग्दर्शन मुरुगादास यांनी केले आहे. याची निर्मिती अल्लाईराजा सुभाषकरण यांनी केली आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याशिवाय अभिनेत्री नयनतारा, निवेथा थॉमस आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. गत 9 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात 27 वषार्नंतर रजनीकांत पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसले आहेत.