Video: अचानक मुंबईत दाखल झाले रजनीकांत; चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 03:19 PM2023-10-29T15:19:56+5:302023-10-29T15:20:31+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांचा मुंबई विमानतळावरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rajinikanth: Video: Rajinikanth suddenly entered Mumbai; Fans love the superstar's simplicity | Video: अचानक मुंबईत दाखल झाले रजनीकांत; चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा...

Video: अचानक मुंबईत दाखल झाले रजनीकांत; चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा...

Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत(Rajinikanth) त्यांच्या आगामी 'थलैवर 170' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी या चित्रपटाची शूटींग सुरू केली आहे. या 33 वर्षांनंतर या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchaan) आणि रजनीकांत एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. दरम्यान, रजनीकांत रविवारी सकाळी अचानक मुंबईविमानतळावरुन बाहेर पडताना दिसले. यावेळी त्यांचा साधेपणा पाहून चाहते खूप खूश झाले.

रजनीकांत यांचा चित्रपटांमध्ये जेवढा Larger than life अंदाज पाहायला मिळतो, तेवढेच ते खऱ्या आयुष्यात साधे आहेत. इतके मोठे अभिनेते असूनही, ते अतिशय सामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगतात. चाहत्यांना त्यांचा हाच साधेपणा आवडतो. वायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्येही रजनीकांत यांचा साधेपणा दिसत आहे. 

व्हिडिओमध्ये रजनीकांत एक छोटीशी बॅग खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी विमानतळावरील स्टाफने त्यांचे हसत हसत त्यांचे स्वागत केले. या व्हायरल व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले- एवढा मोठा सुपरस्टार पण किंचीतही अहंकार नाही. दुसर्‍याने लिहिले- तुम्ही कायम सुपरस्टार राहाल...

Web Title: Rajinikanth: Video: Rajinikanth suddenly entered Mumbai; Fans love the superstar's simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.